नांदेड। नुकताच प्रदर्शित झालेला द काश्मीर फाईल्स चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा. जम्मू आणि काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहेत.
या राज्यांमध्ये 1990 च्या दरम्यान शेजारी राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणात अतिरेकी कारवाया केल्यामुळे या राज्यात राहणारे प्रामुख्याने श्रीनगर, पहलगाम, अनंतनाग व काश्मीर खोऱ्यातील हिंदूंना अमानुषपणे मारहाण करून त्यांची जीवित व वित्त हानी करून या भागातून निर्वासित होण्यासाठी त्यांना भाग पाडले, त्यामुळे हजारो निर्वासित कुटुंबीय जम्मू, दिल्ली या भागात निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहत होते. ईतकी विदारक परिस्थिती निर्माण झाली होती.
या सत्य पार्श्वभूमीवर आधारित तसेच या पार्श्वभूमीची ओळख संपूर्ण जगाला करून देणारा चित्रपट म्हणजे “द काश्मीर फाईल्स" अशा या वास्तववादी चित्रपटाला टॅक्स फ्री करणे गरजेचे असून द काश्मीर फाईल्स हा चित्रपट टॕक्स फ्री करावा अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड भारतीय जानता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी केली आहे.