नायगाव। शहरातील लिटल स्टेप इंग्लिश स्कुल येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जनता कनिष्ठ महाविद्यालयच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका सौ. सुनीता भालके (गारटे) मॅडम, प्रमुख पाहुणे म्हणून नायगाव नगरीच्या प्रथम नागरिक सौ गीताताई नारायण जाधव ताई, सौ. अर्चना संजय चव्हाण (नगरसेविका न.प.नायगाव)ताई उपस्थित होत्या तर प्रमुख वक्त्या म्हणून सुप्रसिद्ध शिव व्याख्यात्या प्राध्यापिका दुर्गा चाटसे मॅडम हया उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील विध्यार्थिनींनी व विध्यार्थ्यांनी विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात सांस्कृतिक नृत्य, अनेक महान भारतीय महिलांच्या छबी, वक्तृत्व तसेच काव्य वाचन सादरीकरण करण्यात आले व भारतीय महिलांचे योगदान या विषयावर भित्तीपत्रके ही सादर करण्यात आली. प्रमुख वक्त्या प्रा. दुर्गा ताई चाटसे यांनी उपस्थित विध्यार्थिनींना आणि महिलांना सशक्त समाजासाठी महिलांचे योगदान काय असावे यावर सखोल आणि उत्कष्ठ मार्गदर्शन केले.
तसेच नगराध्यक्षा सौ गीताताई जाधव व नगरसेविका सौ अर्चना ताईंनी सर्व विध्यार्थिनींचे व सहभागी विध्यर्थ्यांचे कौतुक केले व सर्व शिक्षिकांच्या कार्याचे देखील कौतुक केले. अध्यक्षा प्रा सौ सुनीता भालके यांनी महिलांनी सर्व क्षेत्रात अधिक सहनशील बनावे आणि सुदृढ समाज निर्मणात आपले योगदान देत राहावे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन शाळेच्या सांस्कृतिक विभागाच्या सौ प्रियांका शिंदे, सौ सौजन्या शेवाळकर यांनी केले तर परवीन शेख, सौ शीतल तमन्ना, सौ सविता नयनी, सौ अफ्रिन पठाण, सौ भालेराव टीचर, सौ राजमणी पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार शिक्षिका सौ उषा मजरे यांनी मानले तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.