नांदेड| नविन डंकीन जवळील ऐतिहासिक महादेव मंदीर व उर्वशी घाटाकडे जाणारा रस्ता करण्याच्या मागणीचे निवेदन भाविकांनी नांदेडचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांना ई मेल द्वारे दिले आहे.
डंकीन जवळील श्री उर्वशी महादेव मंदीर व गोदावरी नदीवरील ऐतिहासिक उर्वशी घाट आहे. व श्री गौतम महाऋषी यांची तपोस्थळी, स्वंयभू महादेव व महाकाली देवीचे मंदीर भुयारात आहे. दोन्हीही स्थळांचे फार पुरातन काळापासून महत्व आहे. दुधाधारी महाराज यांचा मठ आहे तो निजामकालीन प्रसिध्द होते. विशेष म्हणजे शिख समाजाच्या ग्रंथात याचा उल्लेख आहे. ऐतिहासिक महत्व असलेला हा घाट मुख्य रस्त्यापासून अंदाजे तीनशे ते साडेतीनशे फुटाच्या अंतरावर आहे. दर सोमवारी, शनिवारी व श्री गंगा गोदावरी स्नानासाठी नांदेड जिल्ह्यातून हजारो भाविक येत असतात तसेच सोमवती अमावस्येस येथे दिंड्या मुक्कामास येतात व मोठी यात्रा सुध्दा भरते. महाशिवरात्री व श्रावणमास या काळात हजारो भाविकांची ये-जा असते. दर सोमवारी रात्री साडे नऊ वाजता श्री महाकाल उज्जेनसारखी महाआरती येथे होते.
यामुळे भाविकांच्या सोयीसाठी सदरील रस्ता पुर्ण करण्याच्या मागणीचे पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर गोविंद दरक, रघुनाथ वाघमारे, संजय पांडे, गोविंद साबू, घनशाम सोनी, ऍड.नरेश देशमुख, विजय दरक, केशव नवरे, सतिश वझरकर, गंगाराम विष्णुपूरीकर, कालु ओझा, सदानंद अण्णा, प्रतापसिंह बिसेन, बालाजी देशमुख, प्रतिभा दरक, आरती शर्मा, राधा वझरकर, सरोजनाबाई विठ्ठल, सुनिता गवळी, संजय वझरकर यांच्या स्वाक्षर्या आहेत. निवेदनाच्या प्रतिलिपी आ.मोहनअण्णा हंबर्डे, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, महापौर, स्थायी समिती सभापती यांना देण्यात आल्या आहेत.