रविवार 20 मार्च रोजी रात्री नऊ वाजता हभप कर्णभारती महाराज एकंबेकर यांचे कीर्तन व जागरण कार्यक्रम होणार आहे. सोमवार 21 मार्च रोजी सकाळी 6 ते 9 च्या दरम्यान श्री ष. ब्र.108 शिवलिंग शिवाचार्य महाराज हेडगापूर व श्री ष. ब्र.108 शंकरलिंग शिवाचार्य महाराज हणेगावकर यांच्या पावन सानिध्यात रुद्रामहापूजा व लिंग स्थापना कार्यक्रम संपन्न होणार आहे.
२१ मार्च रोजी संध्याकाळी १० ते १२ या वेळेत हभप शिवानंदजी शास्त्री (पैठण) यांचे गुलालाचे कीर्तन होणार आहे. यावेळी प्रथम गायक म्हणून सोपान बादलगावकर, वैजनाथअप्पा मंडगीकर, मानाजीराव लोणीकर, उत्तम बादलगावकर, दत्ता कुडलीकर, तर सुनील मरपल्लीकर हे तबल्यावर साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमास महाराष्ट्र, तेलंगणा व कर्नाटक राज्यातील नागरिक उपस्थित राहणार आहेत.
कै. शांतलींगप्पा मरपल्लीकर हे राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक होते.त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवाराकडून त्यांचे समाधिस्थळ बांधले असून त्या निमित्ताने सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मरपल्लीकर स्वामी, चिटमोगरेकर , वाडीकर परिवार व टोंने परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.