हिमायतनगर| तालुक्यातील महादापूर येथील आश्रम शाळेवरील एका युवतीस लग्नाचे अमिश दाखवून सण २०१४ पासून ते जुलै २०२० पर्यंत अत्याचार केल्याप्रकरणी एका युवकावर कलम ३७६ भादंवि आणि सहकलम पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता जाधव या करीत आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला हि महादापूर येथील आश्रम शाळेत सण २०१४ मध्ये शिक्षण घेत होती. शैक्षणिक काळात याचं शाळेत शिक्षण घेणारा अविनाश नामक युवकांसोबत प्रेम जुळाले. मधल्या काळात त्याने सदर महिलेस लग्नाचे अमिश दाखवून आश्रम शाळा महादापूर ता.हिमायतनगर, नांदेडच्या हिंगोली नाका येथील संगीता लॉजवरील किरायाच्या रूमवर नेऊन जबरीने अत्याचार केला.
आणि त्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिल्यामुळे फिर्यादी महिलेने हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून दि.१७ रोजी अविनाश देविदास डोखळे वय २३ वर्ष यांच्यावर कलम ३७६ भादंवि सहकलम ४/६ पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता जाधव या करीत आहेत.