नांदेड| या वैवसाईक युगात यशाची, पैशाची, प्रगतीची स्पर्धा चालू आहे. प्रत्येक जण पळतो आहे. या पळण्यात काही स्वप्ने जी कुटुंबाची आहेत, प्रेमाची आहेत, निवांत पणाची आहेत, अशी स्वप्ने दबा धरून राहतात. खोल मनात ती आहेत याचा उल्लेख करणं कमी पणाच वाटत. पण ती असतात मग अंतर मनातून वेग वेगळ्या प्रकारे डोकावतात. प्रत्ययावर येतात. या सगळ्या घालमेलिंचा आलेख आणि अस्वस्थ हुंकार म्हणजे "ड्रीम्स रिले" हे नाटक होय.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड येथे कुसुम सभागृह येथे संपन्न होत आहे. स्पर्धेच्या सातव्या दिवशी राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, विजय करभाजन दिग्दर्शित "ड्रीम्स रिले" या नाट्य प्रयोगाचे सादरिकरण झाले.
या नाटकात साजन / रंजन ची भूमिका किशोर पुराणिक यांनी साकारली तर सलोनी / रोहिणीची भूमिका डॉ. अर्चना चिक्षे, डिसुझा / मनचंदानी : गिरीष कर्हाड यांनी साकारले. या तिनही कलावंतांनी आपल्या अभिनयाने नाटकाची उंची गाठण्यास यशस्वी ठरले. यातील स्नेहल पुराणिक, रेवती पांडे यांनी साकारलेलं, सूचक नेपथ्य विषयाशी अनुरूप होते. दिगंबर दिवाण, उदय कातनेश्वरकर यांची प्रकाशयोजना, समिरण झिंगरे आणि अनुपमा झिंगरे यांचे संगीत विषयाशी अनुरूप होते तर संतोष चिक्षे, ऐश्वर्या पुराणिक यांनी रंगभूषा आणि वेषभूषा साकारली, रंग मंच व्यवस्था प्रमोद बल्लाळ, अदित्य पांडे, प्रसन्ना पराडकर, अंजली कुलकर्णी, शैलजा पांडे, उपेंद्र दुधगावकर, प्रा. सुरेश लासिनकर यांनी सांभाळली.
स्पर्धेच्या सातव्या दिवशी रविवार असल्याकारणाने तिकिटास रांग पाहावयास मिळाली. स्पर्धेच्या नाटकांना इतका प्रतिसाद मिळणे ये नांदेडकर रसिक प्रेक्षक, स्थानिक कलावंत आणि समन्वयक दिनेश कवडे यांचे यश आहे. दि. ८ मार्च रोजी सरस्वती प्रतिष्ठाण, नांदेडच्या वतीने किरण पोत्रेकर लिखित, स्वाती देशपांडे दिग्दर्शित "कळा या लागल्या जीवा" या नाट्य प्रयोगाचे सादरिकरण होणार आहे.
नोट :- आज दि. ७ मार्च रोजी कोणत्याही नाटकाचे सादरिकरण होणार नाही. त्यामुळे उद्या बातमी/समीक्षण आपणास प्राप्त होणार नाही.(सर्व पत्रकार बंधू नांदेड मधील रंग चळवळ वाढावी म्हणून आप आपल्या माध्यमातून बातम्या प्रसारित करीत आहात त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद )