गटशिक्षणाधिकारी यांचा एवढा अट्टाहास कशासाठी ? शिक्षक सेनेचा सवाल
नांदेड| जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केंद्र प्रमुख पदाचा पदभार हा सेवाज्येष्ठ शिक्षक यांना देण्यात यावा असा आदेश दि.27/01/2022 जि.प.नांदेड शिक्षण विभाग (प्रा.) पत्र क्रमांक 496 नुसार काढला होता. पण आदेश काढूनही जवळपास महिना उलटला तरी कोणतीच कार्यवाही झालेली नाही. शिक्षक सेनेच्या मागणीवरून प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाला जिल्ह्यात अनेक ठिकाणी केराची टोपली दाखवली असून गटशिक्षणाधिकाऱ्यांचा इतका एवढा अट्टाहास कशासाठी असा सवाल शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी विचारला आहे.
नांदेड जिल्ह्यात एकुण 175 केंद्र प्रमुख पदे मान्य आहेत त्यापैकी तीस ते चाळीस पदे कार्यरत आहेत त्यापैकी जवळपास शंभरच्यावर रिक्त पदे आहे. प्रशासनाचा कारभार व्यवस्थित चालावा, शैक्षणिक गुणवत्ता वाढ व्हावी यासाठी हे पद निर्माण झाले होते. पण नांदेड जिल्ह्यात यापदावर प्रभारी पद हे सेवाज्येष्ठ शिक्षक यांना न देता सेवाकनिष्ठ शिक्षक बांधवाना दिले आहे. त्यामुळे या पदावर कार्यरत शिक्षक बांधवांच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.
तसेच शिक्षक बांधवात भांडणे लावणे , गटतट करणे हेच काम कनिष्ठ कडून चालु आहे , सेवाज्येष्ठ शिक्षक यांचा मान न राखणे , गुणवत्ता नाही ना काहीही नाही अशा अनेक बाबी घडत आलेल्या आहेत व वातावरण दुषित झाले आहे. यावर शिक्षक सेनेने शिक्षणाधिकारी बिरगे यांच्या कडे मागणी केली होती की केंद्रप्रमुख या पदाचा पदभार पदभार हा सेवाज्येष्ठ शिक्षक यांना देण्यात यावे. तसे शिक्षणाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. परंतु गटशिक्षणाधिकारी यांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. याचा अर्थ असा समजायचा की आदेशाचे पालनच होत नाही.
सेवाज्येष्ठता डावलून कनिष्ठ शिक्षकांना केंद्रप्रमुख पदाचा पदभार देण्याचा कारभार जवळपास सर्वच तालुक्यात सुरू आहे. याच काय गौडबंगाल आहे? गटशिक्षणाधिकारी यांचा हा अट्टाहास कशासाठी? असा खडा सवाल शिक्षक सेनेने विचारला आहे. याबाबतीत शिक्षक सेनेच्या वतीने आदेशाचे पालन न केले बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार करण्यात येणार आहे. जर अमंलबजावणी होत नसेल तर शिक्षक सेनेच्या वतीने विचारणा करण्यात येईल, असेही शिक्षक सेनेने म्हटले आहे.