शिवणी, प्रकाश कार्लेवाड। किनवट तालुक्यातील शिवणी निर्मल जाणाऱ्या राज्य रस्ता महामार्ग क्र.२६१ च्या गोंडजेवली वन तपासणी नाका पासून मौजे अप्पारावपेट कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्ती साठी कामाची मंजुरी मिळाल्याने संबधित गुत्तेदारांनी काल रात्री जेसीबी ने संपूर्ण रस्ताच खोदून काढला पण पर्यायी रस्ता न काढल्याने काल दि ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गुत्तेदार व गावकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली होती तर बराचवेळ बाचाबाची झाल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाले होते.
महाराष्ट्र व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मौजे अप्पारवपेट येथे दोन ते अडीच हजार लोकसंख्या असलेल्या गावकऱ्यांचे मुख्य बाजार पेठ शिवणी व निर्मल असून येथील गावकऱ्यांना अप्पारावपेट ते निर्मल ला जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे.ह्या रस्त्याचे खड्डे भरण्यासाठी मंजुरी मिळाली व रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.पण संबधित गुत्तेदारांनी रस्त्याचे खोदकाम करण्यापूर्वी पर्यायी रस्ता करणे आवश्यक होते.
पण असे न करता अचानक पूर्ण रस्ता खोदून उकरल्यामुळे गावकऱ्यांना प्रवास करण्यासाठी मोठ्या संकटांना सामना करावा लागत आहे.तर दुरुस्त होत असलेल्या रस्त्याचे काम बंद करून पर्यायी रस्ता काढूनच रस्त्याचे काम सुरू करावे असे म्हणत गावकरी व गुत्तेदार यात आज सकाळी चांगलीच जुंपली होती.खोदलेल्या रस्त्यामुळे प्रवाशांची अपघात होऊन जीवित हानी होऊ शकते जो पर्यंत पर्यायी रस्ता होणार नाही तो पर्यंत रस्त्याचे काम करू देणार नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे असून सध्या गावकऱ्यांनी काम बंद केले आहे.
पर्यायी रस्ता करूनच रस्त्याचे काम सुरू करा असे गावकऱ्यांचे म्हनणे होते.या साठी गोंडजेवली वन तपासणी नाका व अप्पारावपेट या तीन ते चार किलोमीटर रस्त्याच्या मध्यभागी गावकरी व गुतेदारांत चांगलीच जुंपली होती तर बराच वेळ तणाव पूर्ण परिस्थिती निर्माण झाली असता पर्यायी रस्ता उपलब्ध करूनच ह्या रस्त्याचे काम सुरू करावे असे गावकऱ्यांचे गुत्तेदारापुढे ठण ठण म्हणणे होते.तात्पुरता स्वरूपात गुत्तेदाराने काम बंद केले आहे.