पुरुषांच्या यशाच्या पाठीमागे नारी शक्तीचे योगदान --डॉ. कविता फोले -NNL

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे विशेष सत्कार

शिवणी,प्रकाश कार्लेवाड। किनवट तालुक्यातील शिवणी येथील जिल्हा.परिषद (अनु) हायस्कूल येथे दि.८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचेऔचित्य साधून मुख्याध्यापक एस.बी.डहाळे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन व वर्ग दहावीतल्या विद्यार्थ्यांचे निरोप समारंभाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रम प्रसंगी सहशिक्षिका कविता फोले  म्हणाले की,ग्रामीण भागातील अनेक महिला सामाजिक कार्य करत परिवार घडवीत असतात तर ते सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत असतात तर काही महिला हाल,अपेष्टा, कष्ट,दुःख सहन करित आपल्या मुलाबाळांना शिक्षण शिकवून मोठे करतात अशा संघर्षवादी महिलांचा विशेष सन्मान व्हायला पाहिजे.

या देशातील नारी शक्तीच्या त्यागामूळे अनेक महापुरुष घडले या महापुरुषांच्या विचारांची शिदोरी व प्रेरणा घेत ग्रामीण भागातील महिला सुख दुःखावर पाय ठेवून अनेक संकटांना सामोरे जात आपल्या मुलाबाळांना शिक्षण शिकवत समाजात एक नवे आदर्श घडवत आहेत.अशा महिलांचा सन्मान व्हायला पाहिजे.ह्याचे कारण प्रत्येक पुरुषाच्या यशस्वीतेचे योगदान महिलांचेच असे मत व्यक्त केले.व त्या सोबतच दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आणि मी आज जे काही आहे.

आज मी जे काही आहे व ज्यांच्या मुळे माझी ओळख आहे ते म्हणजे मां साहेब जिजाऊ,सावित्रीबाई फुले,माता रमाई सह समाज हितासाठी ज्या-ज्या महिलांनी आपले जीवन संपविले तेच माझे प्रेरणा स्थान असे मत जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन करताना सहशिक्षिका डॉ.कविता फोले यांनी मत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी मा.जिजाऊ साहेब क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माता रमाई यांच्या स्मरणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना  मुख्याध्यापक एस.बी.डहाळे सर यांनी केले.

तर कार्यक्रमास उपस्थित शिवणी येथील महिला सरपंच सौ.लक्ष्मीबाई डुडुळे,श्रीमती कमलबाई देशमुख जि.प.प्रा. शाळेचे व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष संतोष जाधव,मराठी पत्रकार संघाचे तालुका सचिव प्रकाश कार्लेवाड,सुरेश जाधव, नागनाथ औनूरवार,साईनाथ लिंगपूजे,भागोराव डुडुळे, इनामदार मॅडम,व्ही.आर. कोकणे,टी.एच.सय्यद,एस. ई.जाधव, बी.डी.राठोड, आर.एस.चव्हाण,डी. एस.इंदूरकर, एम.आर.गिरी, कु.वाय.एस.कोरेवाड,कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.जि.तरटे यांनी केले तर सूत्र संचलन जे.बी.मलगे यांनी केले.तर आभार इंदूरकर सर यांनी व्यक्त केले कार्यक्रमास हायस्कूल चे विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी