लोहा| शहरातील आडगांव तांडा येथील शेतकरी पंडीत जोमला पवार यांचे घराला लागलेल्या आगीत संसार उपयोगी वस्तु जळून खाक झाली. तहसीलदार व्यकटेश मुंडे यांनी तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपयांचा धनादेश सरपंच मंगेश क्षीरसागर, नगरसेवक दता वाले, उपसरपंच बालाजी पाटील यांच्या हस्ते त्या कुटुंबियास देण्यात आला.
लोहा तालुक्यातील आडगाव तांडा येथे पंडित जोमला पवार यांचे घर जळून खाक झाले. त्यांच्या घरचा पंचनामा तहसिल तहसिलदार व्यंकटेश मुंडे साहेब यांनी करण्याचे आदेश दिले. त्या कुंटूब प्रमुख त्यांना शासनाची पाच हजार रू ची मदत केली. ग्रांमपंचायत मध्ये त्यांना चेक देण्यात आला ., नगरसेवक दता वाले, सरपंच मंगेश पाटील क्षीरसागर उपसरपंच बालाजी पाटील क्षीरसागर चेअरमन प अर्जन क्षीरसागर, मधुकर क्षीरसागर ,किरण क्षीरसागर अनंता टोकलवाड व गांवातील मंडळी उपस्थित होते.