नांदेड| प्रत्येक पुरुष स्त्रियांच्या बाबतीत वाईट नसतो असा निथळ संदेश देणारे नाटक किरण पोत्रेकर लिखित, किरण चौधरी दिग्दर्शित "एक परी" हे नाटक शुभंकरोती फाउंडेशन, नांदेडच्या वतीने महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावर सादर झाले.
एक मुलगी जिचे नाव परी असते. ती आपल्या प्रियकरासोबत घरातील सर्व दागिने, पैसा घेऊन पळून जाते, प्रियकरासोबत लॉजवर राहते आणि एक दिवस तिचा प्रियकर सर्व दागिने, पैसा घेऊन पळ काढतो. तिच्याकडे लॉजवल्यास देण्यास पैसे राहत नाहीत मग लॉजवाला आपले भाडे मिळवण्यासाठी तिच्यावर अत्याचार करतो.
परी हतबल होऊन बसस्टॉपवर तीन दिवसांपासून उपाशी बसलेली असते आणि तिथे गैयबाण्या जो हमाल आहे तो भेटतो आणि तो त्या मुलीला आपल्या रूमवर आणतो. गैबाण्याचा रूम पाटर्नर लेखक असतो. दोन पुरुष आणि एक स्त्री एकाच खोलीत एकत्र राहत असतात पण त्या परीला यांच्यापासून कोणताही धोका होत नाही. ती परी त्यांच्यात स्वतःला सुरक्षित समजायला लागते हा खरा पुरुषी भाव या नाटकातून मांडण्यात आला. प्रत्येक पुरुष हा स्त्रियांच्या बाबतीत वाईट असतात असे नाही. असा निखळ संदेश या नाटकाने दिला.
या नाटकातील परीची भूमिका रागेश्री जोशी यांनी उत्तम साकारली तर लेखकाची भूमिका अमोल जैन, गैबाण्याची भूमिका रमेश पतंगे यांनी साकारली. शिवम पतंगे यांनी अशयानुरूप नेपथ्य साकारले तर प्रकाश योजना: महेश घुंगरे, संगीत: शीला जोशी, रंगभूषा : अश्विनी पोफळे, वेशभूषा: देवयानी जोशी यांनी साकारली.
दिनांक ११ मार्च रोजी, ज्ञानसंवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेड च्या वतीने राहुल जोंधळे लिखित, दिग्दर्शित "जयभिम निळासलाम" या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.शनिवार दिनांक १२ मार्च रोजी शाक्य सर्वांगिन विकास प्रतिष्ठान, परभणी च्या वतीने नारायण जाधव लिखित, सुनील ढवळे दिग्दर्शित "यशोधरा" या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.