नांदेड| वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ आदी क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य रोजंदारी व कायम वन कामगार कृति समितीच्यावतीने मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील शेकडो कामगार सहभागी झाले आहेत.
वनविभाग, सामाजिक वनीकरण, वन विकास महामंडळातील अंशतः रोजंदारी कामगार, रोजगार हमी योजनेवर सातत्याने पाच वर्षे काम केलेल्या कामगारांना 16 ऑक्टोबर 2016 च्या शासन निर्णयानुसार कायम करावे, या निकषानुसार पात्र असूनही राहून गेलेल्या कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे, शासन निर्णयानुसार 7 हजार वनकामगारांना अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, दिल्ली व राजस्थान प्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजनेची अंमलबजावणी करावी.
या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य रोजंदारी व कायम वन कामगार कृति समितीच्यावतीने मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील देगलूर, किनवट, धर्माबाद, उमरी, मुखेड, माहूर आदी तालुक्यातील वन, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळातील कायम व रोजंदारी मजूर मोठ्या संख्येने या आंदोलनात कामगार नेते कॉ.अब्दुल गफार व कॉ.शिवाजी फुलवळे यांच्या नेतृत्वात सहभागी झाले आहेत.