नांदेड| आज दिनांक ०८ मार्च रोजी जागतिक महिला दीना निमित्त नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. श्री उपिंदर सिंग, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड हे कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी होते. प्रोफेसर उषा सरोदे, प्रोफेसर/सामाजिक सायन्स /स्वामी रामतीर्थ मराठवाडा युनिवर्सिटी, नांदेड आणि श्रीमती चंदा रावलकर, जिल्हा युवा समन्वयक अधिकारी, नांदेड या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री जय शंकर चौहान, विभागीय कार्मिक अधिकारी/नांदेड यांनी जागतिक महिला दिनी आपले विचार मांडले. श्रीमती उषा सरोदे, असोसिएट प्रोफेसर/सामाजिक विज्ञान /स्वामी रामतीर्थ मराठवाडा युनिवर्सिटी, नांदेड आणि श्रीमती चंदा रावलकर, जिल्हा युवा समन्वयक अधिकारी, नांदेड यांनी उपस्थित महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. महिलांना भारतीय कायद्यात कसे स्वरक्षण देण्यात आले आहे याची माहिती दिली. तसेच महिलांनी कार्यालयीन कामकाजा बरोबरच स्वतःकडे लक्ष देवून आपले आरोग्य जपावे असे आवाहन केले.
श्री उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतात पूर्वी पासूनच महिलांनी किती महत्वपूर्ण योगदान दिले आहे हे सांगितले. भारतात उल्लेखनीय कार्य केलेल्या अनेक महिला समाज सुधारकांचे / संतांचे त्यांनी स्मरण केले. महिला या कुटुंबाचाच नाही तर समाजाचा कणा असल्याचे ते म्हणाले. आपल्याला जर मजबूत समाज / मजबूत देश हवा असेल तर महिलांनी सशक्त बनले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.