नगरपंचायत हद्दीतील स्मशान भुमीत काम करणाऱ्या सफाई कामगारांना कायम करा -NNL

निवेदन देऊन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे केली मागणी  


हिमायतनगर, अनिल मादसवार|
नगरपंचायत, नगरपालीका, महानगरपालिका हद्दीतील स्मशानभुमीत प्रायोगीक तत्वावर काम करणाऱ्या मसनजोगी समाजातील सफाई कामगारांना सेवेत कायम करून शासन नियमानुसार सेवा शर्ती लागु कराव्यात यावी. अशी मागणी अखिल महाराष्ट्र मसनजोगी महासंघ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण घनसरवाड यांनी यांनी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी निवेदन देऊन केली आहे.

स्मशानभुमीत अनेक ठिकाणी निविदा काढुन (ठेकेदार) पध्दतीने मसनजोगी समाजातील व्यक्ती नगरपंचायत, नगर पालीकाचे हद्दीत सफाई कामगार म्हणुन कामे करतांना अंत्यविधीची विल्हेवाट लावतात, अनेक कामगार महाराष्ट्रात काम करत आहेत. स्वतःच्या व कुटूंबाचा, जिवाचा विचार न करता जिवावर दगड ठेवुन कोरोना महामारीत अंत्यविधीचे काम करतांना, प्रेत उचलने, लाकडे रचने, अग्नी लावल्यावर विखुरलेली लाकडे व्यवस्थीत करणे, आस्थी काढुन देणे, अंत्यविधीची राख काढुन उचलुन खड्डयात, नदित टाकणे कामी पोत्यात भरूण देणे, किंवा खड्ड्यात टाकणे, साफसफाई करूण स्वच्छता ठेवणे, कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तीचे  प्रेत किट मध्ये पॅकींग करणे, अशी अवघड जीवावर बेतनारी कामे केल्याने, राष्ट्रीय आपत्तीमध्ये समाविष्ट झाले आहे. 


मसनजोगी समाजातील व्यक्ती नगरपंचायत, नगरपालीका स्मशान भुमीत (सफाई कामगार) म्हणून कमी मावेजावर काम करत आहेत. स्मशानभुमीत काम करणाऱ्यांना कायमस्वरुपी कामगार (सफाई कामगार) म्हणून कायम करण्यात यावे. अन्यथा वेतन वाढवून दयावे, या विषयीचा विधीमंडळात मसनजोगी समाजासाठी उपेक्षीतांना त्यांच्या साठी नविन विधेयक तयार करावे, मसनजोगी समाजाचा उन्नती आर्थिक, शैक्षणिक, सामाजीक, उन्नती करण्यात यावी. अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे, या विषयीचे निवेदन नुकतेच आमदार माधवराव पाटिल जवळगावकर यांना देण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी