हिमायतनगर| दि.१ मार्च २०२२ मंगळवार रोजी आलेल्या महाशिवरात्रीचे औचित्य साधून हिमायतनगर येथील ब्रह्माकुमारीज् ओम शांती सेंटरवर शिव प्रतीकात्मक शोभायात्रेचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्याने ढोल ताश्याच्या गजरात शिवशंकर महादेवाची झांकी साकारलेली प्रतिमा, डोक्यावर कळस घेऊन महिला मंडळींची भव्य शोभा यात्रा काढून ईश्वरीय संदेश देण्यात आला.
यावेळी शहरातील नागरिकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले व पूजा-अर्चना केली. सर्वप्रथम शहरातील मुख्य रस्त्याने शोभायात्रा मिरवणूक काढून सर्व हिमायतनगर निवासीयांना ईश्वरीय संदेश देण्यात आला. तसेच व्यसनमुक्तीसाठी जनजागृती सुद्धा करण्यात आली. आपल्या दुःखाचे मुख्य कारण पाच मनोविकार आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार यांचा त्याग करणे म्हणजेच शिवाला प्रसन्न करणे आहे. या ५ अवगुणांना आणि व्यसनांना सोडण्यासाठी राजयोगाचा अभ्यास वर्तमान काळासाठी फार उपयोगी आहे. असा संदेश देण्यात आला.
शोभा यात्रा परत आल्यानंतर ब्रह्माकुमारीज् केंद्रावर प्रमुख पाहुणे म्हणून हिमायतनगर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षण बालाजी महाजन यांनी ध्वजारोहण केले. आणि उपस्थितांना शुभ उद्बोधन करून महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा पण दिल्या. त्यानंतर ब्रह्माकुमारी शितल दीदी यांनी ईश्वराचा सत्य परिचय देऊन सर्वांना ईश्वरीय संदेश दिला. तसेच सर्वांना शुभेच्छा देऊन शोभा यात्रेत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.