पालकमंत्री ना.चव्हाण व अनेक मान्यवर निमंत्रीत ; संयोजन समितीची माहिती
नांदेड| अर्धापूर तालुक्यातील येळेगांव येथे बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र,पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ व मातोश्री जनाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कलामहोत्सव व मान्यवरांच्या गौरव सोहळ्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा,जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दि.२६ मार्च रोजी शनिवारी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्रिरत्नकुमार भवरे,संयोजक संभाजी सावते, निमंत्रक तथा अर्धापूर पंचायत समितीचे उपसभापती संतोष कपाटे,आयोजक लक्ष्मणराव मा.भवरे यांनी दिली.
कला महोत्सव व विविध क्षेत्रांत उत्तुंग योगदान असलेल्या मान्यवरांना समतागौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्याचे उदघाटन पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण व मा.आ.अमिताताई चव्हाण यांच्या शुभहस्ते व नांदेडच्या बाजार समितीचे सभापती आनंदराव कपाटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच,माजी पालकमंत्री डि.पी.सावंत, आ. अमरनाथ राजूरकर,आ.मोहनराव हंबर्डे, आ.बालाजी कल्याणकर, आ.माधवराव पाटील जवळगांवकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, गणपतराव तिडके,नरेंद्र चव्हाण, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, दलितमित्र किशोर भवरे,
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सिने निर्माता व दिग्दर्शक एस.व्ही. रमणराव,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर,शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे,आनंदराव पाटील बोंढारकर, उमेश मुंडे,बबनराव बारसे,तिरुपती कोंढेकर, कैलास माने,संजय देशमुख लहानकर,प्रफुल्ल सावंत,मराठी पञकार परिषदेचे विभागीय सचिव प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापूरकर, बालाजी थोरात आदींसह जिल्हास्तरीय मान्यवर वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंत मानधन निवड समितीचे सर्व पदाधिकारी तसेच,स्थानिक लोकप्रतिनिधी,अधिकारी व अनेक मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर व लोकपारंपारिक कलावंताचा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच, समतागौरव पुरस्कार देऊन विविध क्षेञातील मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात येणार असून प्रा.उत्तम कानिंदे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष व पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा.भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कलामहोत्सव व मान्यवरांच्या गौरव सोहळ्याची जिल्हाभरात व्यापक प्रसिद्धीसह जय्यत तयारी सुरू असून या कार्यक्रमाला तमाम शाहीर,लोकपारंपारिक कलावंत व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष वसंतराव कपाटे, सहस्वागताध्यक्ष आनंदराव कपाटे, संयोजन समितीचे अध्यक्ष आनंदराव सावते, सरपंच सौ.सरस्वती गंगातीर,यादव सावते, आयोजक लक्ष्मणराव मा.भवरे,संयोजक संभाजी सावते,गिरजाजी सावते,बाबुराव कपाटे, प्रभु कपाटे,मारोती संभाजी कपाटे,यशवंत थोरात,किरण वाघमारे आदींनी केले आहे.