नवनिर्वाचितांनी सर्वाना विश्वासात घेऊन पत्रकारिता करावी - परमेश्वर गोपतवाड -NNL

हिमायतनगर तालूका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दत्ता शिराणे, उपाध्यक्ष नागेश शिंदे तर सचिव पदी सोपान बोंपीलवार यांची निवड  


हिमायतनगर|
मागील काळातील पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत पत्रकारितेच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी करत नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात पत्रकारितेची शान वाढविली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊले ठेऊन नूतन पदाधिकाऱ्यांनी पत्रकारितेला कोणतेही गालबोट न लागू देता सर्वसमावेशक पद्धतीने पत्रकारिता करून गोर-गरिबांना न्याय मिळून देत हिमायतनगर शहराच्या पत्रकारितेची शान कायम ठेवावी. असे आवाहन जेष्ठ पत्रकार श्री परमेश्वर गोपतवाड यांनी केले.

ते हिमायतनगर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीच्या मंचावरून उपस्थित पत्रकार बांधवाना मार्गदर्शन करताना बोलत होते. आज दि.२४ रोजी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवाची श्री  परमेश्वर मंदिर सभागृहात जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांच्या अध्यक्षतेखाली व प्रकाश जैन,  अनिल मादसवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, पांडुरंग गाडगे, असद मौलाना, पाशा खतीब, शुद्धोधन हनवते, मारोती वाडेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी हिमायतनगर येथील पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी दत्ता शिराणे, उपाध्यक्ष नागेश शिंदे तर सचिव पदी सोपान बोंपीलवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.  

या निवडीनंतर पुढे बोलताना श्री गोपतवाड म्हणाले कि, जुन्या पत्रकारांनी आपले नावलौकिक मिळविण्याबरोबर हिमायतनगरचे नाव उंचावर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे नवनिर्वाचित्र पत्रकारांसह पदाधिकाऱ्यांनी पत्रकारिता करताना आपण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जो व्यवसाय करतो त्या व्यवसायाला अगोदर प्राधान्य देऊन त्यानंतर पत्रकारिता करावी. पत्रकारितेत कुणीही फार काळ राहू शकत नाही, पत्रकारिता हि महत्वाची आहे. मात्र पत्रकारिता करताना सामाजिक जण ठेऊन पत्रकारिता करावी. आणि स्वतः वाहून जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी सामाजिक बांधिलकी अंगीकारून पत्रकारिता क्षेत्रात आपले नावलौकिक करण्याची सूचनाही गोपतवाड यांनी मार्गदर्शनात उपस्थितांना केली. 

सदरील बैठकीमध्ये निवडण्यात आलेल्या नूतन सांघटनेत हिमायतनगर तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालूका अध्यक्षपदी प्रजावानीचे तालूका प्रतिनिधी दत्ता भाऊ शिराणे, उपाध्यक्षपदी मराठवाडा नेताचे प्रतिनिधी नागेश शिंदे तसेच सचिवपदी पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी सोपान बोंपीलवार यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणीत सहसचिव नागोराव शिंदे, कार्याध्यक्ष अनिल भोरे,  शहराध्यक्ष दाऊ गाडगेवाड, सह कार्याध्यक्ष मनोज पाटील, शहर सचिव पाशा खतीब, सल्लागार म्हणून परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, गोविंद गोडसेलवार, अनिल मादसवार, दिलीप शिंदे, संजय कवडे, अनिल भोरे, ज्ञानेश्वर पंदलवाड, अशोक अनगुलवार, पांडुरंग गाडगे, परमेश्वर शिंदे, मौलाना, मारोती वाडेकर, स. अ. मन्नान, जांबुवंत मिराशे, संजय मुनेश्वर, कानबा पोपलवार, शुद्धोधन हनवते, वसंत राठोड, साईनाथ धोबे, आदी तर सदस्य म्हणून धोंडोपंत बनसोडे, धम्मा मुनेश्वर, गंगाधर गायकवाड, परमेश्वर सुर्यवंशी, विशाल हनवते, गजानन चायल, अगद सुरोशे, स. अदिल, अनिल नाईक, विष्णू जाधव, रामजी निर्मलवाड, कृष्णा राठोड, अभिषेक बकेवाड, माधव काईतवाड, प्रशांत राहूलवाड, विजय वाठोरे, दिगांबर गायकवाड, विनोद चंदनकर, लिंगोजी कदम, परमेश्वर सुर्यवंशी, अल्ताफ सोनारीकर आदींसह सतालुक्यातील सर्वच पत्रकारांचा सदस्य म्हणून समावेश असून, नूतन कार्यकारणीचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी