अर्धवट पूल-रस्ते आणि ठिकठिकाणच्या खड्ड्यामुळे हिमायतनगर - किनवट - भोकर मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले -NNL


हिमायतनगर, अनिल मादसवार|
गेली ४ वर्षापासुन माहूर धनोडा - किनवट - हिमायतनगर या सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए चे काम संत गतीने आणि निकृष्ट पद्धतीने केल्या जात असल्याने नेहमी चर्चेत आले आहे. त्यातील किनवट ते हिमायतनगर या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने मनमानी व लपर्वाह पद्धतीने कामाची गती मंद केल्यामुळे मागील काळात अनेकांचे बळी गेले आहेत. तर ठिकठिकाणी खड्डे तर अनेक ठिकाणी अर्धवट पैचेस ठेवल्या गेल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते आहे. एवढेच नाहीतर या अर्धवट रस्त्याच्या कामाला गती मिळावी म्हणून आ.जवळगावकर यांनी रास्तारोको आंदोलन केले, तरीदेखील या कामाला गती देण्यास ठेकेदाराकडून का..? टाळाटाळ होतेय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

किनवट ते हिमायतनगर - भोकर या मार्गामुळे वाहनधारक नागरीक त्रस्त झाले असुन, अनेकांनी जिव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे. नुकतेच हिमायतनगर भोकर येथील मार्गावर राहिलेल्या अर्धवट पैचेस मुले भरधाव वेगातील करणे दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात तालुक्यातील वाळकेवाडी येथील ३ तरुणांचा मृत्यु झाल्याने नागरीकांत ठेकेदाराच्या लपर्वाह वृत्तीबाबत संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर कालचा टेभी फाट्याजवळ स्पीड ब्रेकर नसल्यामुळे दोन दुचाक्यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला यात एका १६ वर्षीय युवकांचा जीव गेला आहे. यामुळे आठवडा उलटण्यात ४ जणांनी आपले प्राण गमावल्यानंतर तरी देखील ठेकेदाराने अर्धवट राहिलेल्या रस्त्यावरील ठिकठिकाणची कामे पूर्ण करून स्पेंडेड ब्रेकर आणि जेथे गावचे फलक व फाटा येथो किमान त्या ठिकाणी तरी दुभाजक करणे गरजेचे असल्याचे मत अनेक जाणकार नागरीकातून व्यक्त केले जात आहे. याबाबत संबंधित विभाग व ठेकेदारने कोणतेही पाऊल उचलले नाहीतर नागरिकांचा सयंमाचा बांध फुटून उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

तर किनवट - हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम दरम्यान ठेकेदारने आवश्यक त्या नियमांचे पालन केले नाही, खरे पाहता सुरुवातील सर्व ठिकाणच्या पुलांचे कामे पूर्ण करून त्यानंतर रस्त्याची कामे मार्गी लावण्याची असताना तसे झाले नाही. त्यामुळे पावसाळ्यात अर्धवट असलेल्या पुलाच्या कामामुळे वाहतूक विसकळीत होऊन तासनतास रस्ते बंद होतात. तर उन्हाळ्यात त्या ठिकाणाहून धुळीचे लोट उडत असल्याने वाहनधारक अक्षरशा वैतागले आहेत. या धुळीमुळे रस्त्याच्या पुढील काहीच दिसत नसल्याने अनेक दुचाकीचालक संभारमात येऊन अडखळून पडत आहेत. ठेकेदाराकडून अर्धवट पुलाच्या ठिकाणी कुठलेही दिशादर्शक अथवा संदेश देणारे व काम सुरु असल्याचे फलक लावले नसल्याने वाहनधारक संभ्रमात पडत आहेत.

अर्धवट पुलाच्या ठिकाणी वळण मार्ग काढला मात्र तिथेही कोणतीही सूचना अथवा रात्रीला रेडियम दर्शक सूचना नसल्याने रात्री अनेक वाहने अर्धवट पुलाच्या खड्ड्यात पडून जखमी होत आहेत. त्यामुळे पांगरी पुलाच्या खड्ड्यात मागील वर्षी २ जणांचा जीव गेला होता. असे असताना देखील ठेकेदाराकडून  नियमांचे पालन केले जात नसल्याने नागरीकांचा नाहक बळी जात आहे. हिमायतनगर शहराजवळील सर्वच फाट्यावर देखील ठेकेदाराने रस्त्याचे मोठे पैचेस जैसेथेच ठेऊन असल्याने येथून भरधाव वेगात येणारे अनेक वाहन घसरुन पडून नागरिक जखमी होत आहेत. 

या अर्धवट ठेवण्यात आलेल्या पैचेसमुळे एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते. यदाकदाचित असे संबधित गुत्तेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी नागरीकातून केली जात आहे. हि बाब लक्षात घेता अश्या घटना होऊ नयेत यासाठी ठेकेदारने तातडीने येथील अर्धवट पैचेसचे सिमेंटीकरण पूर्ण करून शहरातील रखडलेल्या रत्स्याचे काम पावसाळीपूर्वी मार्गी लावावे आणि अपघात टाळण्यासाठी उड्डाण पूल, डिव्हायडरचे काम पूर्ण करावे  नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी