रविवारी तरुणांसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली
नांदेड| मिशन कश्मीर फाईल्स अंतर्गत नांदेड शहरातील ११०० तरुणांना कश्मीर फाईल्स हा सिनेमा मोफत दाखवण्याचा निर्धार करण्यात आला असून, त्यासाठी बुधवार दि.२३ मार्च २०२२ रोजी पीव्हीआर सिनेमाचे सर्व ८ शो ची सर्व तिकिटे आरक्षित करण्यात आली आहेत. ती रविवारी तरुणांसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
सध्या संपूर्ण देशात चर्चेत असलेला कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रत्येक तरुणाने पाहणे आवश्यक आहे. भाजप महानगराध्यक्ष प्रविण मसाले यांनी महाराष्ट्र शासनाकडे हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी केली होती. परंतु शासनाने दखल न दिल्यामुळे भाजपा महानगर नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ नांदेड च्या वतीने लोकसहभागातून अकराशे तरुणांना तिकीटे देण्यात येणार आहेत.या प्रोजेक्टला मिशन कश्मीर फाईल्स हे नाव देण्यात आले आहे. दिलीप ठाकूर यांनी पिव्हीआर सिनेमाच्या मॅनेजमेंट सोबत चर्चा करून बुधवारचे सर्व आठ शो ची सर्व तिकिटे आरक्षित करण्यात आली आहेत. सिनेमाच्या वेळा पुढील प्रमाणे आहेत.सकाळी ९ ,दुपारी ११.४५,दुपारी १२.३०,दुपारी ४, सायंकाळी ६.३०,रात्री ७.३०,रात्री १०,रात्री ११ अशा राहणार आहेत.
सकाळचा पहिला शो धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे मोफत दाखविण्यात येणार आहे. इतर शो लोकसहभागातून मोफत दाखविण्यात येणार आहेत. तिकिटे मोफत दिली तर अनेक जण तिकिटे घेऊन जातील आणि फुकट मिळाल्यामुळे एखाद्यावेळेस पाहायला येणार नाहीत. त्यामुळे तिकिटे वाया जातील.तसेच एखादी गोष्ट फुकट मिळाली की त्याची किंमत राहत नाही. त्यामुळे पूर्ण विचार करून खालील योजना आखली आहे.
एका तिकिटाची किंमत रु १४० आहे. तसेच मध्यंतरात रु ७० चे पाॅपकार्ण देण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण रु २१० किंमत असलेले तिकीट रु ५० दिल्यानंतर तरुणांना मिळतील. तरुणांनी जरी रु ५० ला तिकीट घेतले तरी त्यांना सत्तर रुपयाचे पाॅपकार्ण मिळणार असल्यामुळे कश्मीर फाईल्स हा चित्रपट मोफतच पाहायला मिळणार आहे.सिनेमा व पाॅपकार्ण च्या एकत्रित किंमतीच्या २१० रुपयांपैकी १० रुपयांची सवलत पिव्हीआर सिनेमा च्या मॅनेजमेंटने दिली आहे. उर्वरित रुपये १५० लोकसहभागातून जमा करण्यात येणार आहे. कमीत कमी रु १५०० जमा करून १० टिकीटे स्पॉन्सर करणाऱ्यांची नावे दररोज सोशल मीडियातून प्रसिद्ध करून किमान एक लाख लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात येणार आहे. ९४२१८ ३९३३३ या मोबाईल वर गुगल पे अथवा फोन पे द्वारे देणगी जमा करावी.
देणगी देणाऱ्यांची नावे शो च्या दिवशी पीव्हीआर सिनेमा च्या समोर होर्डिंग द्वारे जाहीर करण्यात येणार आहेत.तसेच उद्घाटनाच्या वेळी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.आत्तापर्यंत ॲड. दिलीप ठाकूर यांनी १३०, सतीश बाहेती मालेगाव यांनी ५१, स्नेहलता जयस्वाल २५,भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष सुमित नरसिंह राठोड २० तर शशिकांत विलासराव देशपांडे बाराळी तसेच ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष किशोर नोमूलवार, सिद्राम दाडगे, आशा शर्मा हैदराबाद,पुष्पराज जैस्वाल हैदराबाद यांनी प्रत्येकी १० तिकीटासाठी देणगी जमा केली आहे.
उद्दिष्टपूर्ती साठी ७९४ तिकिटे शिल्लक असल्यामुळे जास्तीत जास्त दानशूर राष्ट्रप्रेमी नागरिकांनी तिकिटे स्पॉन्सर करावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.ज्या तरुणांना बुधवारी चित्रपट मोफत पाहायचा आहे. त्यांनी रविवार दि.२० मार्च रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भाजपा महानगर कार्यालय विष्णू कॉम्प्लेक्स, व्हीआयपी रोड, नांदेड अथवा भाऊ ट्रॅव्हल्स, पाटणी कॉम्प्लेक्स, डॉ. लेन, कलामंदिर समोर नांदेड अथवा बनी प्लेरूम ', राज मॉल जी-०६ ,आनंद नगर चौक नांदेड या ठिकाणी प्रति टिकीट रु. ५० जमा करून तिकिटे घ्यावी. तिकीट विक्री फक्त रविवारी करण्यात येणार आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले, संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील धनेगावकर व व्यंकट मोकले, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख धीरज स्वामी, सोशल मीडिया जिल्हा संयोजक राज यादव, सहसंयोजक अक्षय अमिलकंठवार,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल सचिव अरुणकुमार काबरा, कोषाध्यक्ष सुरेश निल्लावार, प्रोजेक्ट चेअरमन स्नेहलता जायस्वाल, अंकुश पार्डीकर, अजयसिंह परमार, रोहित ठाकूर यांनी केले आहे.