महामार्गावरील मुरमाच्या डिगाराला धडकुन दोघे जागीच ठार -NNL

शिबदरा पाटी येथील आठवड्यातील दुसरी घटना 


हदगाव, शे.चांदपाशा| 
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून चालू आहेत वारंगा ते महागाव हे काम करीत असताना जागोजागी खड्डे, वळण रस्ते व तसेच जागोजाग मुरुमांचे ढिगारे असल्याने अनेक अपघात घडत आहेत. हे काम करणा-या कंपनीच्या निष्काळजी पणामुळे या दोन महिन्यांमध्ये सात अपघात मध्ये सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. तर आठ जण गंभीर जखमी झाले.

तरीसुद्धा संबंधित कंपनीला जाग यायला तयार नाही दि.२५ रोजी हिगोली जिल्ह्यातील चिखली गावात तालुका कळमनुरी येथे अंत्यविधी करून आपल्या गावाकडे हरडप ता. हदगावकडे परत येत असताना शिबदरा पाटी येथे महामार्गावर मध्यभागी मुरमाचा मोठा अधिकार टाकला आहे. त्या ढिगारापुढे कुठल्याही प्रकारचे दिशा दाखवणारे फलक.... ना रस्ता बंद असल्याचे फलक... नसल्यामुळे समोरून येणार्‍या वाहनांमुळे काही दिसत नसल्याने अपघाताची मालिका चालूच आहे. असे असताना देखील संबंधित कंपनीकडून कासव गतीने काम केले जात असल्यामुळे या माहर्गावर सातत्याने अपघात घडत आहेत संबंधित कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

हरडफ येथील सटवाराव सूर्यवंशी वय ४८, माधव बोंढारे वय ५०, राहणार हरडप तालुका हदगाव हे दोघे जण चिखली येथे अंत्यविधीला मोटरसायकलने गेले होते. परत आपल्या गावाकडे हरडपला जात असताना शिबदरा पाटी येथे वेळ ७.३५ वाजता मुरमाच्या ढिगाराला धडकून दोघे जण जागीच ठार झाले. मनाठा पोलीस स्टेशनला माहिती मिळताच घटनास्थळी बीट जमादार गिरी व त्यांचे सहकारी पोहोचून.  पुढील प्रक्रिया चालू केली होती. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी