कोळी महादेव व कोळी मल्हार या दोन्ही जमातीचे पारंपारिक मूळ वस्तीस्थान असलेल्या बालाघाट महादेव डोंगर रांगातील जमाती बाबतचे प्राचीन ऐतहासिक शासकीय पुराव्याचे अवलोकन करून न्यायालयीन निकाल विचारात घेऊन या जमाती वरील अन्याय दूर करणे संबंधीचे निवेदन पुराव्यानिशी आयोगाचे अध्यक्ष जयेश अभ्यंकर यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय यलमवाड मार्गदर्शक मारोती मामा मामिलवाड, युवा प्रदेश अध्यक्ष संदिप पिल्लेवाड, शहराध्यक्ष साईनाथ बोइनवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित सर्व समाज बांधवांच्या समक्ष प्रशासकीय अधिकारी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देताना देत असलेल्या त्रासाबाबत माहिती सांगले व जात प्रमाणपत्र देताना रक्ताचे नातेवाईकचे प्रमाणपत्र असल्या शिवाय प्रमाणपत्र मिळत नाही पण आदिवासी समाज हा शैक्षणिक द्रष्ट्या मागास आहे त्यामुळे काही जणांकडे प्रमाणपत्र आहेत तर काही जणांकडे प्रमाणपत्र नाहीत याबाबत पण विचार करण्यासंबंधी संदिप पिल्लेवाड यांनी सांगून निवेदन देण्यात आले. यावेळी मन्नेरवारलू समाजाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पूपलवाड, गुणवंत मिसलवाड, शिवराम बोधागिरे, बलाजिराव इंगेवाड, सोपानराव मारकवाड, बळीराम कोनेरी, दादाराव कोठेवाड, के. एन. जेठेवाड, आनंदा रेजितवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यातील कोळी महादेव व मन्नेरवारलु समाजावर होत असलेल्या अन्यायाबद्दल सर्व माहिती मिळाली त्याबाबत मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सविस्तर चर्चा करून सर्व माहिती कळवीनार आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या कडून प्रमाणपत्र देण्यासंबंधी होणाऱ्या पक्षपाती धोरणाबद्दल स्वतः जिल्हाधिकारी यांना बोलून प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात आदेशित करतो. अशी प्रतिक्रिया जयेश अभ्यंकर यांनी दिली.