आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आडवणुक करणाऱ्यां अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा - आ.डॉ.राठोड -NNL

 जात प्रमाणपत्र पडताळणी सह - संचालक दिनकर पावरा यांची तात्काळ बदली करून येथे बिगर आदिवासी समाजातील अधीकाऱ्यांची नेमणूक करा


मुखेड, रणजित जामखेडकर।
आदिवासी कोळी , आदिवासी मनेरवारलू समाज बांधव मुखेड / कंधार विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. या दोंन्ही समाजातील बहुसंख्य विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रकरणे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.

आदिवासी समाजाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी विभागीय कार्यालय औरंगाबाद आहे‌. येथील सह - संचालक पदावर दिनकर पावरा हे अधिकारी मागील पाच वर्षांपासून कार्येरत काहेत. दर तिन वर्षांनी या अधिकाऱ्यांची कालबाह्य बदली होणे गरजेचे असतांना सुध्दा या समाजातील विद्यार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवण्यासाठीच या अधिकाऱ्यांची येथे कायम ठेवण्यात आले आहे की काय ? अशी भावना आदिवासी समाज बांधवांची झाली आहे.

म्हणुन माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की औरंगाबाद येथील आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणी सह - संचालक दिनकर पावरा यांची तात्काळ बदली करावे यांचे कारण असे की आदिवासी समाज बांधवांचे ९ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत त्यापैकी ७ हजार प्रकरणे हे आदिवासी कोळी व मनेरवारलू बांधवांची आहेत.

आणी त्यांनी जे १२०० प्रकरणे रद्द केली होती त्यापैकी १०५० प्रकरणांना सुप्रिम कोर्टाने पाॅझीटिव्ह करुन समाजातील शोषीतांना न्याय दिले आहेत.यावरून लक्षात येते की येथील दिनकर पावरा या अधिकाऱ्यांनी आदिवासी कोळी आदिवासी मनेरवारलू समाज बांधवांची जाणीवपूर्वक अडवणूक करून त्यांना मानसिक त्रास देत आहेत. यामुळेच समाजाची दिशाभुल करित असल्याची धारणा समाजाची झाली आहे.

त्यामुळे औरंगाबाद येथील आदिवासी जात पडताळणी प्रमाणपत्र सह - संचालक दिनकर पावरा यांची तात्काळ बदली करून तेथे बिगर आदिवासी समाजातील अधीकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ तुषार राठोड यांनी चालु अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे. आदिवासी समाजाचा प्रश्न सभागृहात मांडुण न्याय हक्कासाठी आवाज उठविल्याबध्दल आदिवासी कोळी, आदिवासी मनेरवारलू समाज बांधवांनी आ.डॉ‌.तुषार राठोड यांचे स्वागत करून अभार मानले आहेत. 

आदिवासी कोळी समाजातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा प्रश्न सभागृहात मांडुण समाजातील शोषीतांना न्याय दिल्याबद्दल लोकप्रिय आ‌.डॉ.तुषार राठोड यांचे मन;पूर्वक अभिनंदन, धन्यवाद साईनाथ भाऊ बोईनवाड आदिवासी कोळी, मल्हार कोळी समाज संघटना शहराध्यक्ष मुखेड.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी