याबाबत सविस्तर व्रत असे की, डॉ.विद्या अमोल सुंकवाड वय 33 वर्ष या महिलेने दि.22 मार्च रोजी रेल्वे स्थानक भागात असलेल्या पंजाब लॉजमध्ये एक रूम किरायाने घेतली होती. दोन दिवसांपासून येथे असलेली डॉक्टर महिला दि.24 मार्च रोजी बाहेर आली नसल्याने लॉजच्या व्यवस्थापकाने दार वाजविले. बराच वेळ होऊन कांही फायदा झाला नसल्याने पुन्हा एकदा लॉज व्यवस्थापनाने उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद दिला नसल्याने पंजाब लॉज चालकाने वजिराबाद पोलीसांना माहिती दिली.
तात्काळ पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, त्यांचे सहकारी अधिकारी, घटनास्थळी पोहचले. आणि पोलीसांनी लॉजच्या रुमचे दार तोडून दार उघडले असता डॉ.विद्या सुंकवाड हिचा मृतदेह आढळून आला. मृतदेह असलेल्या बाजूला नॉयलॉन दोरी, औषध गोळ्या, होत्या. डॉ महिलेच्या शरिरावर जखमा होत्या. डॉ महिलेच्या गळ्याची नस, हाताची नस कापलेली दिसत होती. या घटनेचा पंचनामा पोलिसांनी केला असून, ही का घडली कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत, या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासकीय यंत्रणेकडून सुरू होती.