वेगवेगळ्या विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी सुनील जी मानसिंगा( केंद्रीय गोसेवा आयोग सदस्य ) महेंद्रभाई संगोई, (गोशाळा महासंघ प्रांताध्यक्ष) जयेश भाई शहा अॅड. मोतीसिंह मेाहता, भाऊरावजी कुदळे (विश्व हिंदू परिषद क्षेत्र गोरक्षा प्रमुख )देवेंद्र भाई (समस्त महाजन ट्रस्ट) सुधीरजी विद्वांस (प्रशिक्षण प्रमुख रा.स्व. संघ) ह.भ.प.संदिप महाराज शर्मा, मनीष वर्मा(गोसेवा प्रांत संयोजक रा.स्व.संघ) नवीनभाई ठक्कर हे व्यासपीठावर उपस्थित होते हा कार्यक्रम शुभारंभ मंगल कार्यालय कलेक्टर निवास च्या पाठीमागे येथे संपन्न झाला.
या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात उपेंद्र भाऊ कुलकर्णी यांनी गोशाळा महासंघाची आवश्यकता तसेच कार्य व नियोजन कसे असावे यावर मार्गदर्शन केले तर अॅड. मोर्तीसिंग मोहोता यांनी कायदेशीर बाबीतील गोभक्त व गोशाळांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन केले. महेंद्र भाई संगोई यांनी पण महासंघाचे अध्यक्ष या नात्याने गोशाळा महासंघाचे कार्य ट्रष्टी समोर मांडले. तसेच सुनील मानसिंगा यांनी भारतीय वंशाची वेगवेगळ्या स्वदेशी गायीच्या जाती विषयी सखोल अशी माहिती तसेच पंचगव्य औषधी व चिकित्सा या विषयी मार्गदर्शन केले.
तसेच या संमेलनात भाऊरावजी कुदळे यांनी गोशाळांचे व्यवस्थापन या विषयी व देवेंद्रभाई यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले तर या संमेलनात आलेल्या सर्व गोशाळा आर्थिक समस्येवर मात करून आत्मनिर्भर कशा होतील याविषयीचे मार्गदर्शन समारोपीय सत्रात सुधीर विद्वांश यांनी केले याप्रसंगी गोशाळा ट्रस्ट पैकी प्रल्हाद घोरबांड, किरण बिच्चेवार, मारोती महाराज, सौ. अवटेताई, कोरे यांनी पण मनोगत पण या प्रसंगी व्यक्त केली. या संमेलनात मराठवाडा तील १२५ गोशाळांच्या २५० ट्रस्टींची उपस्थिती होती .
या प्रसंगी गोवशांशी संबधीत सर्व कायाद्याच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सूर्यवंशी या गोशाळा महासंघाचे महाराष्ट्र प्रांताचे संयोजक यांनी केले तर प्रास्ताविक गिरीश जोशी कार्यकारणी सदस्य गोशाळा महासंघ महाराष्ट्र प्रांत यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी किरण बिच्चेवार गोरक्षा विभाग प्रमुख नांदेड विभाग विश्व हिंदु परिषद ,सनत महाजन प्रल्हाद घोरबांड ,चेतन खडसे यांनी विशेष प्रयत्न केले.