आज शासकीय विश्राम ग्राहात बैठक झाली,या बैठकीत ओबीसी जागर अभियानात बंजारा क्रांती प्रदेशअध्यक्ष दलाचे विकास राठोड,भीम सेनेचे मराठावडा अध्यक्ष विनोद वाघमारे, यशवंत सेनेचे टोपाजी काकडे,राजेश पांढरे,पारधी समाजाच्या नेत्या शिला शिंदे,सत्यपाल नारवाडे हे पूर्णवेळ सहभागी राहतील असे ठरले.
आरक्षण हक्क संवर्धन समितीच्या वतीने, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने राज्यभर काढण्यात येणाऱ्या ओबीसी जागर अभियान संयोजक समितीची स्थापना करण्यात आली आहे. मुख्य संयोजक ऍड.रेखा चव्हाण (नवी मुंबई)लता बंडगर(उस्मानाबाद) राजा रणवीर(अलिबाग)श्याम निलंगेकर (नांदेड) यांची निवड करण्यात आली आहे.
ओबीसी जागर अभियानाची सुरुवात १५ एप्रिल रोजी नांदेड येथून सुरुवात होईल. मा.खा.व्यंकटेश काबदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास मा. खा.हरिभाऊ राठोड, मा.हरि नरके, मा.आ. लक्ष्मण माने,प्रा,सुशीला मोराळे,प्रा. सुषमा अंधारे,मा.प्रकाश लोखंडे मा.ललित बाबर, मा के.ई.हरदास यांची उपस्थिती राहणार आहे.
ओबीसी जागर अभियानाचा समारोप ३० एप्रिल रोजी पुणे येथे होणार आहे.ओबीसी जागर अभियान संयोजक समिती स्थापन करण्यात येणार असून, शुक्रवार,२५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता हॉटेल ताज पाटील येथे बैठक बोलावण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ओबीसी जागर अभियानात सर्व परिवर्तनवादी नागरिकांनी सहभागी व्हावे असे अहवान आरक्षण हक्क संवर्धन समितीचे राज्य संघटक श्याम निलंगेकर यांनी केले आहे.