बालपण घालवलेल्या गावाच्या विकासासाठी काम करण्याची भावना आनंद द्विगुणित करणारी -खासदार हेमंत पाटील -NNL

उंचेगावनजिक पुलासाठी २५ कोटी, हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीवरील वाटेगावच्या पुलासाठी २५ कोटी तर गांजेगाव पुलासाठी ३० कोटीचा निधी मंजूर


नांदेड/हिंगोली/यवतमाळ,अनिल मादसवार।
हिंगोली लोकसभा मतदार संघातील रस्ते  आणि पूल बांधकामासाठी खासदार हेमंत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भरीव निधी यंदाच्या अर्थसंकल्पात मंजूर झाला असून, मतदार संघात येणाऱ्या नांदेड  जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचेगाव येथे कयाधु नदीवर पूल बांधकाम करण्याकरिता २५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

या पुलामुळे नांदेड, हिंगोली  जिल्हा आणि उमरखेड महागाव तालुक्यातील जनतेला पुसद नागपूर जाण्याचा मार्ग सुकर झाला असून तब्बल ५० किमी च्या वर अंतर आणि वेळ वाचणार आहे.  तळणी , उंचेगाव या गावांच्या  परिसरात माझे  बालपण गेले त्याभागाच्या , तालुक्याच्या विकासासाठी काहीतरी करण्याची तळमळ मनात अनेक वर्षांपासून दाटून होती . योगायोगाने कयाधू नदीवर पूल बांधकामाचा योग्य जुळून आला व या कामासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे विशेष आग्रह धरून मंजुरी मिळवून घेतल्याची भावना खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त करून याभागात घालवलेल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. 

यंदाच्या अर्थसंकल्पात हिंगोली लोकसभा मतदारसंघ कोट्यधीश झाला असून संपूर्ण मतदारसंघासाठी १४२ कोटीच्या वर निधी मंजूर झाला असून, यामध्ये रस्ते आणि पुल बांधकामासाठी नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर , किनवट माहूर तालुक्यासाठी ३४ कोटी ६० लक्ष रुपयाचा निधीची तरतूद केली आहे. यामधील प्रमुख आणि सर्वसामान्य जनतेच्या तात्काळ कमी येणारे काम म्हणून हदगाव तालुक्यातील उंचेगाव येथील कयाधू नदीवरील पूल आहे. तो तळणी  -साप्ती -कोहळी -शिरड - पेवा -करोडी- उंचेगाव -भानेगाव -हदगाव रस्ता राज्य मार्ग ४१६ कि. मी. मध्ये २५/६००  या साखळी रस्त्यांतर्गत येतो कयाधु नदीवर  मोठ्या पुलाचे जोडरस्त्यासह व भूसंपादना करून  बांधकाम करण्यासाठी २५ कोटीचा भरीव निधी मंजूर केला आहे . 

मतदारसंघातील हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीवरील वाटेगावच्या पुलासाठी २५ कोटी तर गांजेगाव पुलासाठी ३० कोटीचा निधी  खासदार हेमंत पाटील यांनी यापूर्वीच मंजूर करून घेतला आहे. तर हदगाव मधील वायपना व हिमायतनगर मधील पळसपूर येथील ग्रामीण रस्त्यासाठी १६ कोटींचा निधी मंजूर करून नुकतेच त्या कामाचा शुभारंभ केला आहे. उंचेगाव येथे कयाधू नदीवर होणाऱ्या या पुलामुळे जुन्या नागपूर महामार्गाला झळाळी मिळणार असून नांदेड , हिंगोली जिल्ह्यातील प्रवाश्याना थेट विदर्भात जाता येणार आहे त्याकरिता पूर्वी ५० किमीच्या वर फेरा घेऊन पुसद नागपूर जावे लागत होते ते या पुलामुळे सोयीस्कर होणार आहे . खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकार आणि सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे मतदारसंघात आणखीही महत्वपूर्ण विकास कामे तेजीने सुरु आहेत लवकरच त्याचे मूर्त रूप मतदारसंघातील जनतेला दिसेल यात दुमत नाही .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी