वैयक्तिक कार्यक्रमात तरी राजकारण नसावं -खा. प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL


नायगाव,दिगंबर मुदखेडे |
 शहरातील व पंचक्रोशीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व स्व. डी. बी. पाटील होटाळकर यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे पुतळा अनावरण, स्मरणीका, दिनदर्शीका व ज्ञानयज्ञ भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अध्यक्षीय समारोपामध्ये वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये राजकारण कोणीही करू नये असे मत व्यक्त केले


प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वैयक्तिक घटना-घडामोडी येत असतात आपण सर्वाच्या सुख-दुःखात सहभागी राहिले पाहीजे फक्त राजकारण व स्वार्थासाठी संबंध न ठेवता कायमचे संबंध निर्माण करण्याची धमक नेत्यामध्ये हवी मी कधीही वैयक्तिक कार्यक्रमात राजकारण करत नाही म्हणूनच आज सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते माझ्यावर जिवापाड प्रेम करतात. राजकारण म्हणले कि पक्ष आलाच माझ्यासारखा साधा कार्यकर्ता चार पक्ष बदलून सुद्धा मला जनतेने खूप सहकार्य केले.  या भागातील उद्योजक तथा शैक्षणिक क्षेत्रातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून स्व, डी.बी. पाटील होटाळकर यांचा उल्लेख करणे उचित राहील असेही मत त्यांनी व्यक्त केले.

होटाळकर परिवार हा एक  प्रतिष्ठित शेतकरी व उद्योजक म्हणून या तालुक्यांमध्ये सुप्रसिद्ध आहे पण काही दिवसापूर्वी स्व.डी.बी. पाटील होटाळकर यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये घेतलेली उत्तुंग भरारी ही उल्लेखनीय आहे त्यांच्या कार्याचा उल्लेख करताना प्रवासाचा आलेला खूप अनुभव त्यांनी या प्रसंगी सांगितलं नांदेड ते मुंबई सलग्न दहा वर्षे प्रवास केल्याचा अनुभव खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी व्यक्त केला खा. चिखलीकर यांनी आपल्या शैली मध्ये या कार्यक्रमाला कोण कोण विरोध केला ते परमेश्वरालाच माहिती असा टोलाही त्यांनी लगावला.


राजकारण म्हणल्यानंतर पक्ष नेता या गोष्टी आल्याच पण एका विशिष्ट वैयक्तिक पक्षाचा द्वेष करून किंवा व्यक्तीचा द्वेष करून वैयक्तिक राजकारण न करता सार्वजनिक विकासाच्या बाबतीत राजकारण व्हावे व वैयक्तिक कुठल्याही कार्यक्रमांमध्ये सर्व पक्षांनी एखाद्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे सक्षम उभे राहावे राजकारण होतच राहणार पण एखाद्याच्या जीवनात आलेल्या प्रसंगाला सर्वांनी पाठीशी उभा राहून साथ देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करावा तसा प्रयत्न मी स्व. डी.बी. पाटील होटाळकर यांचे छोटे भाऊ श्री शिवराज पाटील होटाळकर यांचा मी करणार व मोठ्या भावाची कमतरता भासू  देणार नसल्याचे मत यावेळी  प्रतिपादन केले

नायगाव येथील मिलेनियम इंग्लिश स्कूल व स्व. डी,बी. पाटील होटाळकर कॅम्पस या ठिकाणी श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा दिनांक 11 ते 15 आयोजन केलेले आहे ह. भ. प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मधुर वाणीने आयोजन करण्यात आले. याप्रसंगी स्व. डी, बी, पाटील होटाळकर यांच्या अर्धकृती पुतळा अनावरण,  दिनदर्शिका प्रकाशन. स्मरणिका. बाल उद्यानचे उद्घाटन याप्रसंगी करण्यात आले या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर माजी मंत्री डाँ.माधवराव पाटील किन्हाळकर.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, स्वच्छतादूत माधवराव पाटील शेळगावकर माजी आमदार तथा अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण, आ. राम पाटील रातोळीकर, आ. विक्रमजी काळे, भाजपा प्रदेश कार्यकारणी  सदस्य राजेश देशमुख कुंटूरकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महापौर सौ.जयश्रीताई पावडे, बालाजीराव बच्चेवार श्रावण पाटील भिलवंडे, रवींद्र पाटील भिलवंडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरिहररावजी भोसिकर, जि.प.सभापती संजय आप्पा बेळगे, वसंत पाटील सुगावे, माणिकराव लोहगावे, संजय पाटील शेळगावकर, मोहनराव पाटील टाकळीकर. रमेश देशमुख शिवणीकर. प्रवीण पाटील चिखलीकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, पं.स.नायगांव सभापती सौ. प्रभावतीताई विठ्ठल कत्ते.नगरध्यक्षा संगीताताई नारायण जाधव. भाजपा तालुकाध्यक्ष  कोंडीबा पाटील शिंदे. आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा सचलिंत सर्व शाळेतील शिक्षक व कर्मचारी व दत्तात्रय पाटील होटाळकर, शिवराज पाटील होटाळकर, मित्रमंडळाचे सर्व पदधिकारी यानी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे प्रास्तविक शिवराज पाटील होटाळकर तर सुत्रंसचलन व्यकंटेश चौधरी, पत्रकार बाळासाहेब पांडे माजरमंकर यानी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी