नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे ग्रामीण क्षेत्रातील महिला व , युवतीसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या अंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती महिलांना कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण दिले जात आहे.
यामध्ये शिलाई मशीन प्रशिक्षण, ब्युटीपार्लर, फॅशन डिझायनिंग व एमएस-सीआयटीचे प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यातील सुमारे 2 हजार 896 महिला व युवतींना हे प्रशिक्षण दिले जात आहे. किनवट व माहूर तालुक्यात 1 हजार 771 तर इतर तालुक्यांमध्ये 1125 महिला व युवती महिला व बाल विकास विभाग व नियुक्त संस्थेव्दारे प्रशिक्षण दिले जात आहे. या माध्यमाने ग्रामीण भागातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळणार आहे.