हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील आठ दिवसापासुन महाशिवरात्रीच्या निमित्ताने हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात सुरु असलेल्या अखंड हरिणाम, विना पहारा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता दि. ०३ ,अर्चा रोजी ग्रामदिंडी व हभप. नारायण महाराज गरड यांच्या मधुर वाणीतील काल्याच्या किर्तनाने करण्यात आली. याप्रसंगी ग्रामीण व शहरी भागातुन हजारोंच्या संख्येने श्री परमेश्वर भक्तांचा जनसागर लोटला होता.
ग्रंथराज पारायण शेवटच्या दिवशी म्हणजे अखंड हरिणाम सप्ताह समाप्ती नीमीत्त दि.०६ मार्च रविवारी सकाळी ९ वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची पालखी दिंडी व्यासपीठाचार्य हभप शिवाजी महाराज वडगावकर यांच्या नेतृत्वाखील शहरातील मुख्य रस्त्यावरुन काढण्यात आली. या शोभा यात्रेत चिमुकल्या मुलीं डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ व हाती भगवा ध्वज घेऊन बालके सामील झाले होते. तसेच टाळ मृदंगच्या गजरात श्री परमेश्वर भजनी मंडळाच्या वारकरी महीला व पुरुषांनी ताल धरुन शहरवासीयांना आकर्षीत केले. शहरातील मुख्य रस्त्यावरून निघालेली शोभा यात्रा परत श्री पमेश्वर मंदिरात येऊन सत्कार समारंभ व महाप्रसादाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा समारोप करण्यात आला.
त्यानंतर दुपारी ०१.३० वाजता सुरु झालेल्या काल्याच्या कीर्तनात जवळपास ३ तास हभप. नारायण महाराज गरड यांनी उपस्थित भक्तांना श्रीकृष्ण लीलाचे सखोल असे मार्गदर्शन करून भक्तीचा मार्ग दाखविला. सायंकाळी ५ वाजता काल्याच्या किर्तनानंतर राधा -कृष्णाची झाकी साकारलेल्या बालकांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. काल्याच्या प्रसाद वितरणानंतर दहीहंडी फोडलेल्या राधाकृष्णीची मीरवणुक शहरातील मुख्य रस्त्यावरुन काढण्यात आली.
यावेळी परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, लक्ष्मण शक्करगे, विठलराव वानखेडे, अनंता देवकते, प्रकाश शींदे, राजाराम बलपेलवाड, माधवराव पाळजकर, वामनराव बनसोडे, मुलचंद पिंचा, लताबाई पाध्ये, लताबाई मुलंगे, मथुराबाई भोयर, शांतीलाल सेठ, ऍड दिलीप राठोड, शांतीलाल श्रीश्रीमाळ, अनिल मादसवार, संजय माने, राजु गाजेवार, मारोती हेंद्रे, देवराव वाडेकर, राजू राहुलवाड, मारोती वाघमारे, प्रकाश साभळकर, दत्ता काळे, दत्तात्रेय हेंद्रे, अनिल भोरे, विलास वानखेडे, रामू नरवाडे, गजानन चायल, गंगाधर बासेवाड, उदय देशपांडे, पापा पार्डीकर, यांच्यासह बजरंग दलाचे युवक स्वयंसेवक व गावकरी नागरीक महीला - पुरुष हजारोच्या संख्येने उपस्थीत होते.