हदगाव, शे चांदपाशा| शहरासह तालुक्यात प्रमुख गावाच्या प्रमुख रोडवरुन दिशादर्शक फलक गायब झालेली असुन, जे फलक आहेत ते दिशाभूल करणारी असुन, या बाबतीत संबंधित विभाग या़ची दखल घेतील काय अस सवाल नागरिक विचारित आहेत.
हदगाव तालुक्यात अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक जिर्ण व गावाची नावे उडालेली असुन, तर काही ठिकाणी वेडीवाकडही झालेली दिसुन येतात. त्यामुळे नवीन वाहन धारकाना ठिकाणावर जाण्यासाठी विचारपुस करत मार्गक्रमण करावे लागत आहे. दिशादर्शक बोर्ड नियोजित स्थळी जाण्यास मोलाची भुमिका पार पाडतात. मात्र हदगाव शहराच्या मुख्य प्रवेश हायवे रोडवर दिशादर्शक फलक नसल्याने इतर शहरातुन व राज्यातुन येणारे वाहने जड वाहने शहरात येत असल्याने वाहतुकीचा खोळबा होत आहे.
एवढाच नाहीतर उलट अपघाताची शक्यता निर्माण होत असून, नागपुरला जाण्यासाठी हदगाव मार्ग जावे लागते. पण दिशादर्शक फलक नसल्याने ते वाहन सरळ शहरात प्रवेश करतात. तसेच माहुरच्या भाविकांना पण हा मणस्ताप सोसावा लागत आहे. राञीच्या वेळी तर जे प्रवास करतात अश्याना तर फार ञास होतो आहे. बाहेर कुणीही नसल्याने कुणाला विचारावे कसे जावे असा प्रश्न निर्माण होत आहे. या कडे सार्वजनिक बाधकाम विभागाने लक्ष दयावे अशी मागणी होत आहे.