उस्माननगर, माणिक भिसे| येथील परिसरातील माळरानावर वृक्ष फुलांनी बहरून नागरिकांचे मन आकर्षित करीत आहे.
पळसाच्या झाडाला जेव्हा फुले येतात तेव्हा उन्हाळ्याची चाहूल लागते.,कारण हे झाड बहु गुणकारी असतात.कारण या झाडाच्या पानांपासून आजही पतरवाळ्या बनविल्या जातात, आजकालच्या धकाधकीच्या आयुष्याच्या जीवनात वावरताना और्वेदीक वनस्पती कडे पाठ फिरवली जात आहे.
सहा वर्षांपूर्वी नागरिक माळावर जावुन पळसाची फुले तोडून उन्हाला ठेवून फूले वाळून त्याचा रंग तयार करून रंगपंचमी खेळली जात असे.
झाडाच्या फुलांपासून होळीच्या सणाला रंग वापरले जात होते. उस्मान नगर परिसरातील शिवारात मोठ्या प्रमाणात पळसंबा गिरडी माहेर का लाल पांढरा आधी वृक्षांना लागलेल्या फुलांमुळे नागरिकांचे मन आकर्षित केल्या जात आहे उन्हाळ्यास सुरुवात झाल्याची चाहूल विविध वृक्ष देत आहेत.
माळरानावर जिकडेतिकडे लालभडक फुले डोळ्यांना आकर्षित करीत आहेत खेड्यापाड्यात पळसाच्या फुलाचा रंगपंचमीच्या दिवशी रंग म्हणून उपयोग केला जातो. लहान मुले पळसाची फुले तोडून ती वळवण्यासाठी ठेवतात फुले वाढल्यानंतर बारीक कुठून त्यांचा रंग म्हणून रंगपंचमीला उपयोग केला जातो. गतवर्षी सर्वत्र कोरोनाची लाट होती. यामुळे नागरिक रंगपंचमी पासून कोसो दूर होती. यावर्षी नागरिक रंगपंचमी बेधुंद होऊन खेळतील आशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे.