महिलांच्या कार्याबाबत संध्याताई कल्याणकर यांचे केले कौतुक
नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून शिव संपर्क अभियान सुरू होते. यासाठी शिवसेना पक्षाचे सचिव तथा खा. अनिल देसाई नांदेड शहरात तळ ठोकून होते. यादरम्यान त्यांनी विविध ठिकाणी सभा तसेच भेटी घेतल्या आहेत. नांदेड उत्तर मतदार संघाचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या पत्नी संध्याताई कल्याणकर यांच्या देखील कार्याची पाहणी खा. अनिल देसाई यांनी केली आहे.
संध्याताई कल्याणकर यांनी आपल्या पतीच्या पावलावर पाऊल टाकत सर्वसामान्य, कष्टकरी महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध केला आहे. पेटिकोट, हळद, मिरची पावडर या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध केला आहे. त्याबरोबरच सूक्ष्म व लघु उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्याची महिलांना अडचण निर्माण होत होती. त्यासाठी त्यांनी शिवालय निधी अर्बन बँकेची स्थापना केली. या बँकेच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटांना अर्थसहाय्य होत आहे.
याची पाहणी शिवसेनेचे सचिव तथा खा. अनिल देसाई यांनी केली आहे. खा. अनिल देसाई यांनी संध्याताई कल्याणकर यांचे यावेळी कौतुक केले आहे. त्याबरोबरच कोणतेही समस्या असो, त्यासाठी मी व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपल्या सोबत आहोत असा अभिप्राय शिवालय निधी बँकेच्या नोंदी वहित केला आहे. यावेळी संपर्कप्रमुख आनंद जाधव, आ. बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंद बोढांरकर, तालुकाप्रमुख जयवंत कदम, गौरव कोटगिरी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवालय प्रतिष्ठानचे कर्मचारी उपस्थित होते.