लालवंडी येथे सामाईक भिंत पाडण्याच्या कारणावरुन पत्रकार कोपलवार दांपत्यास मारहाण-NNL

नायगाव पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल

नायगाव, दिगंबर मुदखेडे। तालुक्यातील व नायगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे लालवंडी येथील पत्रकार मारोती महाजन कोपलवार यांना सामाईक भिंत पाडण्याच्या कारणा वरून गावातीलच रहिवासी असलेले संगे पवाड कुटूंबातील तीन आरोपीने संगणमत करून कुरहाडीसह ,सबलीने ,हातातील फावड्याने मारोती कोपलवार यांच्या डोक्यात व तोंडावर मांडीवर आरोपीने जब्बर मारहाण केली तर त्यांची पत्नी स्वाती मारोती कोपलवार हिच्या डोक्यात मारहाण करून जखमी झाल्या.

या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात लालवंडीच्या तीन आरोपीच्या विरोधात गुर नं. ३७ / २०२२ कलम ३०७, ३२६, ३२४, ३२३, ५०६, ३४ भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे तिन्ही आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी आरोपी कधी अटक होणार ? याकडे फिर्यादीसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
    
तालुक्यातील लालवंडी येथील रहिवासी असलेले पत्रकार मारोती महाजन कोपलवार वय ३९ वर्षे राहणार लालवंडी तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून गावातीलच रहिवासी असलेले आरोपी लक्ष्मण तुकाराम संगेपवाड, साईनाथ लक्ष्मण संगेपवाड ,गजानन लक्ष्मण संगेपवाड यांनी संगनमत करून सामाईक भिंत पाडण्याच्या कारणावरून फिर्यादी मारोती महाजन कोपलवार यांच्या डोक्यात कुन्हाडीने मारहाण केली. 

सबलीने फावड्याने मारोती कोपलवार व स्वाती कोपलवार च्याडोक्यात जबर मार लागल्याने प्रथम नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु पुढील उपचारासाठी नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस नाईक साई सांगवीकर व पो. चितळे यांनी दिली.
    
सदर प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी नायगाव पोलिसांना ऑनलाईन बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचण आल्याचे पोलीसांनी सांगितले असून सदरचा गुन्हा दिनांक ५ मार्च २०२२ रोजी नायगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे हे करताहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी