हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून "सन्मान कर्तुत्वाचा: स्त्री जागृतीचा" या अंतर्गत आदरणीय प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिमायतनगर पोलिस स्टेशनचे पोलीस अधीक्षक मा. भगवानराव कांबळे साहेब लाभले होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड न्यूज लाईव्ह चे संस्थापक अध्यक्ष मा. अनिल भाऊ मादसवार तसेच पोलिस स्टेशन चे श्री कुलकर्णी साहेब आणि महिला प्रतिनिधी म्हणून डॉ शेख शहेनाज व डॉ सविता बोंढारे ह्या ही उपस्थित होत्या.
सुरुवातीला मंचावरील मान्यवरांनी सावित्रीबाई फुले व वीर हुतात्मा जयंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंचावरील महिलांचे व उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केरण्यात आले.
कार्यक्रमाच्या स्वागतानंतर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवानराव कांबळे साहेबांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना पुलिस स्टेशन च्या वतीने शुभेच्छा दिल्या. व थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मराठी विभागाचे प्रमुख डॉ सूर्यप्रकाश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अनेक यशस्वी महिलांच्या कृतुत्वाचा चढता आलेख त्यांनी मांडला.
याप्रसंगी डॉ शेख शहेनाज व डॉ सविता बोंडारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांनी आपल्या ओजपूर्ण वाणीतून अनेक उदाहरण व दृष्टांतासह आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन संयोजक समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. के. कदम यांनी केले. तर आभार हिंदी विभागाचे प्रमुख तथा कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचा संपूर्ण स्टॉफ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदरील कार्यक्रम हा covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करून घेण्यात आला.