नांदेड जिल्हा पोलिस दलाच्या वतीने कोरोणा काळात पोलीस पाटील म्हणुन कार्यरत असलेल्या दोन पोलीस पाटील यांनी उत्कृष्ट सेवा बजावली ,सेवा बजावत असतांनाच कोरोणा रोगा मुळे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जोशी सांगवी येथील बापुराव महाजन बलतंडवार व गंगाधर व्यंकटराव इंगळे रा.ईब्राहिमपुर ता.देगलुर या दोघांचे निधन झाले होते.
या दोघांना ही महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने मदत मिळवण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी नांदेड परिक्षेत्राचे परिक्षेत्र अधिकारी निसार तांबोळी यांचा मार्फत या प्रस्तावास मान्यता देऊन हा प्रस्ताव गृह विभागा कडे पाठवुन सानुग्रह अनुदान मंजुर करून घेतला व निधन पावलेल्या दोन पोलिस पाटील यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लक्ष आर्थिक मदत मंजूर केली व लवकरच कुटूंबियांना देण्यात येणार आहे, या बद्दल राज्यपाल पुरस्कार प्राप्त न्यु कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव बकाल, नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव जोगंदड,कंकाळ, यांचा सह ऊपसिथीत पोलीस पाटील यांनी अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.