नांदेड| कै.शंकरराव चव्हाण व कै.कुसूमताई चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही कै.पद्मीनबाई देशमुख सेवाभावी संस्था चिकाळा या संस्थेच्यावतीने यशवंत महाविद्यालय प्रांगणात माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते शेकडो झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी ना.अशोकराव म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी वेगवेगळ्या प्रसंगाचे औचित्य साधून शारदा भवन एज्युकेशन सोसायटीमध्ये हरीत क्रांती करण्याचे काम केले आहे. त्यांनी मागील वर्षी लावलेली झाडे आज बर्याच प्रमाणात मोठी झाली असून संस्थेमध्ये शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांना, कर्मचार्यांना स्वच्छ व निरोगी वातावरण देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांचे भविष्य नक्कीच उज्वल असेल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे आयोजक तथा कै.पद्मीनबाई देशमुख सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी सर्व पाहुण्यांचे शाल, पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. मुगट सर्कलचे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा ना.अशोकराव चव्हाण साहेबांचे समर्थक म्हणून त्यांची जिल्हाभर ओळख आहे. त्यांनी कै.शंकरराव चव्हाण जयंती व पुण्यतिथीनिमित्त गेल्या 6 वर्षापासून वेगवेगळे समाजीक उपक्रम राबवणे, ना.चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य, महिलांना साडी चोळी वाटप, अन्नदान, साहेबांना निरोगी आयुष्य लाभण्यासाठी महामृत्युंजय आरती यासह अनेक कार्यक्रम राबविले आहेत.
यावेळी माजी आ.अमिताभाभी चव्हाण यांनी त्यांना कार्यक्रमासाठी आर्शिवाद दिला. कार्यक्रमास माजी मंत्री डी.पी.सावंत, संस्थेच्या सदस्या कु.श्रीजया अशोकराव चव्हाण व कु.सुजया अशोकराव चव्हाण, मुन्ना अब्बास, भूमन्ना आक्केमवाड, बालाजीराव मिरकुटे, प्राचार्य शरदचंद्र शिंदे, सहसचिव निंबाळकर, कोषाध्यक्ष डॉ.रावसाहेब शेंदारकर, प्रबंधक संदीप पाटील, प्रा.एस.बी.थोरात, रंगनाथ जाधव, अनिता सुभाषराव देशमुख, अमोल देशमुख, सचिन देशमुख, सुरेश पाटील, प्रा.सचिन पाटील, प्रा.चिल्लावार, प्रा.तेलंग सर, के.टी.तेलंग, बाबुराव आडे, गजानन पाटील, मसले सर, बिराजदार सर, शिवाजी भोसले, जगदीश उमरीकर, विलास धुताडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी सर्व उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले.