नविन नांदेडl नांदेड तालुक्यातील शहरालगत व पंचक्रोशीतील जाज्वल्य व जागृत असलेल्या तिर्थक्षेत्र काळेशवर विष्णुपुरी नांदेड येथे महाशिवरात्री निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांसह पालकमंत्री अशोकराव चव्हाण,माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे, माजी पालकमंत्री डि.पी.सांवत व माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या सह संरपच , नगरसेवक व लोकप्रतिनिधी यांनी दर्शन घेतले.
तिर्थक्षेत्र काळेशवर विष्णुपुरी नांदेड येथे महाशिवरात्री निमित्ताने काळेशवर मंदिर देवस्थान येथे २१ ते २८ फेब्रुवारी रोजी अंखड हारीनाम सप्ताह , शिवलीलामृत पारायण,गाथा व भजन किर्तन,हारीपाठ आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते २८ फेब्रुवारी रोजी हभप भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांच्ये काल्याचे किर्तन व महाशिवरात्री निमित्ताने संगित भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सायंकाळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण, आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार डि.पी.सांवत, जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटणकर, महापौर जयश्री ताई पावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, सभापती संगिता पाटील डक, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, सभापती किशोर स्वामी, श्रीनिवास मोरे,यांच्या सह पदाधिकारी व मान्यवरांनी दर्शन घेतले.
मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त राहण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड व साहयक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, संकेत दिघे, उपनिरीक्षक आनंद बिचेवार,माणिकराव हंबर्डे, विजय पाटील, महेश कोरे व महिला कर्मचारी , अंमलदार यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दोन मार्च रोजी सकाळ पासूनच मोठ्या प्रमाणात महाप्रसाद वाटप करण्यात आले.