औरंगाबाद येथील अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी सह संचालक दिनकर पावरा यांची ठाणे येथे बदली ...
नुकतेच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकप्रिय आ.डॉ.तुषार राठोड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनकर पावरा यांची तत्काळ बदली करण्याची मागणी सभागृहामध्ये केली होती. गेल्या अनेक वर्षापासून या पदावर दिनकर पावरा हे औरंगाबाद येथे ठाण मांडून बसले होते. त्यानी जाणीवपूर्वक आदिवासी कोळी, मल्हार कोळी समाज आणि मन्नेरवारलू समाजाच्या जात वैधता प्रमाण पत्रासाठी जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याचा आरोप दिनकर पावरा यांच्यावर सभागृहामध्ये आ.राठोड यांनी केला होता.
याबाबत मराठवाड्यातील आदिवासी समाजबांधवांनी आमदार डॉ. तुषार राठोड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे बदली करण्याची मागणी केली होती.या तक्रारीची दखल घेत मी आमदार डॉ.तुषार राठोड यांनी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये याबाबत आवाज उठवून गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या व अनुसूचित जमातीच्या आदिवासी कोळी समाज व मन्नेरवारलू समाजाच्या प्रमाणपत्र धारकांची अडवणूक करणाऱ्या आणि आदिवासी समाजाचे असलेल्या पावरा यांची तत्काळ बदली करण्याची मागणी केली होती त्यामुळेच सरकारने आज दिनकर पावरा यांच्या बदलीचे आदेश धडकवले असून त्यांची ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. या बदलीमुळे आदिवासी महादेव कोळी आणि मन्नेरवारलू समाज बांधवांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.