आपल्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ३० हजारांची केली होती मागणी
नांदेड| वारसा हक्कात वडीलोपार्जित जमीनीची नोंद घेण्यासाठी ३० हजारांची लाच द्यावी लागेल. हे पैसे केवळ माझ्यास्तही नाहीतर मला वरिष्ठ अधिकाऱ्यास द्यावे लागतात असे म्हणून तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसलेल्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर ३० हजार रुपये लाच मागणी करणार्या महिला तलाठ्याविरुध्द नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील मौजे चिखली येथील एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीनंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. यावेळी चिखली येथील तलाठी सोनाली काकडे यांच्याकडे त्यांच्या वडिलोपार्जित जमीनीची नोंद वारसा हक्कात करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज दिला होता. त्यावर कार्यवाही न करता तलाठी सोनाली काकडे यांनी माझ्यासह माझ्या वरिष्ठांना मिळून ३० हजार रुपये द्यावे लागतील. अश्या पद्धतीने लाच मागणी केली असल्याचे तक्रारदाराने तक्रारीत संगितले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १७ जानेवारी २०२२ रोजी पंचासमक्ष लाच मागणी केल्याची पडताळणी केली. मात्र त्या दिवशी त्यांनी पैसे स्विकारले नाहीत. परंत्तू याबाबत महिला तलाठी सोनाली काकडे यांच्याविरुध्द भाग्यनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अरविंद हिंगोले, एकनाथ गंगातीर, जगन्नाथ अनंतवार, शेख मुजीब, ईश्वर जाधव आणि आशा गायकवाड यांनी पार पाडली.