‘काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य !’ या विषयावर विशेष संवाद -NNL

रशिया-युक्रेन युद्धावर बोलणारे काश्मीरमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी का बोलत नाहीत ? - प्रा. रेणुका धर बजाज, दिल्ली विद्यापीठ

   


700 
काश्मिरी कुटुंबाशी चर्चा करून आणि वर्षांच्या अभ्यासानंतर हिंदूंची वस्तुस्थिती मांडणारा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बनवण्यात आला आहेया चित्रपटातून काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे भीषण सत्य भारतियांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहेमात्र कोणत्याही सरकारने या विषयावर समिती स्थापन करून सत्य शोधण्याचा प्रयत्न केलेला नाहीया विषयावर कुठेच प्रसिद्धीमाध्यमांमध्ये चर्चा होतांना दिसत नाहीरशिया-युक्रेन युद्धात लोकांवर झालेल्या अत्याचारांविषयी प्रसिद्धी माध्यमांनी जेवढी जागृती केली आहे.

तसे काश्मीरमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी का बोलत नाहीतअसा प्रश्‍न दिल्ली विद्यापिठातील प्राध्यापिका तथा राजकीय विश्‍लेषक रेणुका धर बजाज यांनी उपस्थित केलाहिंदु जनजागृती समिती आयोजित ‘द कश्मीर फाइल्स काश्मीरी हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य !’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादत त्या बोलत होत्याहा विशेष संवाद  11  हजारांहून अधिक लोकांनी पाहिला.

या विशेष संवादात बोलतांना या चित्रपटातील एक अभिनेते श्रीप्रकाश बेलवाडी म्हणाले की, 32 वर्षांपूर्वी भारतातील एका राज्यांत हिंदूंबरोबर काय झालेहे भारतियांना अद्यापही माहिती नाहीहे धक्कादायक आहेखरे तर गेल्या 32 वर्षांत भारतातील हिंदूंनी काश्मिरी हिंदूंसाठी काहीही केले नाहीआतातरी हिंदूंनी जागृत होऊन काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून दिला पाहिजेया चित्रपटावर सर्वत्र चर्चा सुरू झाली पाहिजे.

यावेळी ‘जम्मू इक्कजुट्ट’ या संघटनेचे अध्यक्ष तथा अधिवक्ता अंकुर शर्मा म्हणाले की, वर्ष 1947 पासून भारतात हिंदूंचा नरसंहार झाला, हे सर्व सरकारांनी,  प्रसिद्धी माध्यमांनी, प्रशासकीय अधिकार्‍यांनी स्पष्टपणे नाकारले आहे. काश्मीरमधील नरसंहारावर ‘विशेष तपास पथक’ स्थापन करून चौकशी करण्याची काश्मिरी हिंदूंची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, हेच नाकारले जात असेल, तर काश्मिरी हिंदूंना न्याय कसा मिळणार ? हा नरसंहार नाकारणे, हे दुप्पट नरसंहार करण्यासारखे आहे. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर म्हणाल्या की, काश्मिरी हिंदूंचा नरसंहार हा एका दिवसात अचानकपणे झालेला नाही. 

हे फार आधीपासून षड्यंत्र चालू होते. त्यासाठी पैसा पुरवण्यात आला. हिंदूंच्या याद्या करून त्या सर्वत्र वाटण्यात आल्या. ‘हमे कश्मीर चाहिए, हिंदू नही !’, अशी प्रसिद्धीपत्रके काढण्यात आली; याकडे तत्कालीन राज्य आणि केंद्र सरकार यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. मोहन गौडा म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने देशभरात 500 चित्रप्रदर्शने लावून, तसेच अनेक सभा घेऊन 10 लाख हिंदूंना जागृत केले आहे. काश्मिरी हिंदूंना न्याय मिळेपर्यंत समिती हा लढा चालूच ठेवेल.

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,  (संपर्क : 99879 66666)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी