जोतिबा देवस्थान येथील हक्कदार पुजारी, गुरव समाज, ग्रामस्थ,भाविक यांसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनाचे संघटित यश -NNL

श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री जोतिबा देवस्थान येथील -पासची सक्ती रहित,
तसेच श्री जोतिबा देवस्थान येथील सर्व द्वारे भाविकांसाठी खुली !


पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत येणार्‍या साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी देवी आणि श्री जोतिबा देवस्थान येथील मंदिर प्रवेशासाठी भाविकांना 
-पास’ सक्तीचा होतात्याचसमवेत श्री जोतिबा देवस्थान येथील येथील चारपैकी एकच द्वार भाविकांसाठी खुले होतेतरी श्री जोतिबा देवस्थान येथील मंदिरातील चारही द्वारे उघडून -पास’ सुविधा बंद करावीया मागणीसाठी जोतिबा डोंगर येथे 11 मार्चपासून धरणे आंदोलन चालू केले होते

या आंदोलनात हक्कदार पुजारीगुरव समाजग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. 12 मार्च या दिवशी या आंदोलनास हिंदु जनजागृती समितीसह कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आलाया विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही आंदोलनाची चेतावणी दिली होतीअखेर या आंदोलनाच्या रेट्यामुळे श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री जोतिबा देवस्थान येथील -पासची सक्ती रहित करण्यात आली असून श्री जोतिबा देवस्थान येथील सर्व द्वारेही भाविकांसाठी खुली करणार असल्याचे देवस्थान समितीने घोषित केले आहे.

12 मार्च या दिवशी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलनास पाठिंब्याचे पत्र जोतिबा डोंगर ग्रामपंचायत सरपंच सौराधा बुणे यांना देण्यात आले होतेया वेळी शिवसेनेचे कोल्हापूर उपशहरप्रमुख श्रीशशी बिडकरहिंदुत्वनिष्ठ श्रीरामभाऊ मेथेअधिवक्ता अमोल रणसिंगहिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्रीकिरण दुसे आणि श्रीशिवानंद स्वामीसनातन संस्थेचे डॉमानसिंग शिंदे उपस्थित होते.

एकीकडे शासन सर्व खुले करतांना नाट्यगृहेचित्रपटगृहेकार्यालये यांसह जवळपास प्रत्येक ठिकाणी 100 टक्के उपस्थितीस अनुमती देत आहेअसे असतांना -पास’ सक्तीची भूमिका अनाकलीय होतीयामुळे भाविकांची प्रचंड गैरसोय होत होतीग्रामीण भागातून येणार्‍या भाविकांना प्रत्येक वेळी -पास’ काढणे शक्य होत नसल्याने त्यांना दर्शनाविना रहावे लागत होतेअखेर हिंदूंच्या रेट्यापुढे प्रशासनाला झुकावे लागलेमंदिरे ही हिंदूंसाठी चैतन्याचा स्रोत असल्याने यापुढील काळात तरी मंदिर प्रशासनाने भाविकांच्या हिताचे निर्णय घ्यावेतअशी अपेक्षा सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या निमित्ताने व्यक्त केली आहे. 

श्रीशिवानंद स्वामीसमस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांकरिता (संपर्क क्रमांक : 7020710460)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी