नांदेड| विनायक नगर भागातील सिद्धिविनायक गणेश मंदिर तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस उपनिरीक्षक दुर्गाताई लोकरे यांचा सत्कार करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या भागातील ज्येष्ठ महिला विमलताई ए. काळे ह्या होत्या तर यावेळी प्रा. ललिता कुंभार, वैजंताबाई कदम, सुरेखा नागापूरकर, रुक्मिणीताई कुंभार, अंजली मनोहर पोहरकर, इंद्रायणी संजय नागापूरकर, शर्मा मॅडम, चिंतावार, श्रीमती येवतकर या उपस्थित होत्या. यावेळी विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सौ दुर्गा ताई लोकरे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या की चूल आणि मूल यातच आडकलेली महिला आता सर्व क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे.
महिलांनी स्वतःला कधीच कमी समजू नये असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक नगर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष ऍड. प्रदीप नागापूरकर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रद्धा करण कदम यांनी केले. यावेळी आंतरराज्य कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक, इतर पथकांसह घवघवीत यश मिळवणार्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धीविनायक श्री गणेश मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी कदम, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बी. एस. कुंभार, संस्थेचे सहसचिव अमरप्रीत सिंग जज, गणेश तेलंग सीमा कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.