उद्देश सोशल फाउंडेशनने घेतला पुढाकार
हदगाव/निवघाबाजार, शे.चांदपाशा| हदगाव तालुक्यातील निवघाबाजार येथुन ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे कोळी ता.हदगांव येथील रमेश जगताप यांचा काही वर्षांपूर्वी अपघात झाला, त्यामुळे त्यांना कोणतेही काम करता येत नाही. उपन्नाचे कोणतेही साधन नसल्याने आपल्या दोन मुली एक मुलगा, पत्नीसह एका छोट्याशा खोलीत राहून दिवस काढीत आहेत. नुकताच एका मुलीचा विवाह केला दुसरी मुलगी कोकीळाचा विवाह जुळला मात्र हळदीच्या परिस्थितीमुळे मुलींसाठी काहीच खरेदी करू शकले नसल्याची माहिती मिळताच उमरखेड येथील माऊली हॉस्पिटलच्या डॉ रावते दांपत्यांनी सादर मुलीला कन्यादान स्वरूपात साहित्य खरेदी करून मदत दिल्याने आज तिचा विवाह थाटात संपन्न झाला.
आज दि.२५ मार्च रोजी विवाह असताना परीस्थितीमुळे काहीच साहित्य खरेदी करू शकले नसल्याची माहिती येथील पत्रकार दिपक सुर्यवंशी यांनी बंडु माटाळकर प्रभाकर दहीभाते यांना दिली. त्यांनी खात्री करून ही माहिती उमरखेड येथील उद्देश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक ठाकरे यांना दिली. त्यांनी लगेच आपल्या ग्रुपमध्ये तातडीची मदतीसाठी आवाहन केले असता उमरखेड येथील सुप्रसिध्द बालरोगतज्ञ् डॉ.श्रीराम रावते व स्त्रीरोग तज्ज्ञ सौ.अर्चना श्रीराम रावते यांच्या माऊली हॉस्पिटलच्या स्त्री विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त गरजु कुटुंबातील विवाहाला मदत म्हणून दहा हजार रुपये मदत केली.
या रक्कमेतून विवाहाला लागणारे संसार उपयोगी भांडी व अन्नधान्य साहित्य खरेदी करून २३ रोजी कोळी येथील त्या कुटुंबाला मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. दोन दिवस अगोदर भल्या पहाटे घरी आलेले साहित्य बघुन परीवाराच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. अश्याच प्रकारे गरजुंना सर्वानी मदतीसाठी पुढे येणे काळाची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
यावेळी उद्देश सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष दिपक ठाकरे, जगदीश भुसावार, अनिल महामुने, पवण शहाणे, संदीप कदम रुईकर ,कोळी येथील सरपंच संजय कदम, वंचित बहुजन आघाडीचे हदगाव तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव, तंटामुक्त समिती अध्यक्ष गंगाधर चौतमाल, पत्रकार बंडु माटाळकर , प्रभाकर दहीभाते, दिपक सुर्यवंशी रामराव चौतमल यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.