विद्यापीठाने एम.फिल गाईड बदलून देण्यास नाकारल्यामुळे विद्यार्थ्याचा अमरण उपोषणाचा निर्णय -NNL


नांदेड।
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील, भाषा, वांग्मय व संस्कृती संकुलातील एम.फिल अभ्यासक्रमाचा संशोधक विद्यार्थी लक्ष्मीकांत बाळासाहेब पवार यांना गाईड बदलून देण्याची मागणी विद्यापीठाने अमान्य केल्यामुळे दि.16 मार्च 2022 रोजी विद्यापीठा परिसरात आमरण उपोषण करण्याचे निवेदन प्रस्तुत विद्यापीठाचे मा. कुलगुरू यांना दिले आहे. 

लक्ष्मीकांत पवार यांनी विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग,भाषा संकुलातील प्रा. डॉ. योगिनी सातारकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विषयात एम.फिल संशोधन करीत होते नंतर त्यानी काही कारणास्तव गाईड बदलून घेण्याच्या उद्देशाने विद्यापीठाच्या एम.फिल /पी.एच.डी नियमावलीनुसार विद्यापीठास लागणारे आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली. जसे पूर्वीच्या गाईडकडून रीतसर "ना हरकत प्रमाणपत्र"घेऊन व बदली गाईड म्हणून प्रा.डॉ राजपालसिंह चिखलीकर यांची "अनुमती पत्र"घेऊन इंग्रजी विभागा मार्फत कुलगुरू कार्यालयात प्रस्ताव दाखल केला व त्याचा प्रस्ताव पि.जी विभागाकडे अग्रेषित केल्यानंतर पुढील कार्यवाहीत तत्कालीन प्रभारी प्र.कुलगुरू यांनी गाईड बदलून देण्याचे निकष जे संलगनीत महाविद्यालयातील प्राध्यापकाना एम. फिलची गाईडशिप देण्याचा अकॅडमिक कौन्सीलच्या निर्णयाचे  परिपत्रक दि.13/01/2014 च्या आधारावर व तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकना एम. फिल गाईड दिल्याच्या दाखल्यावर सदरील विध्यार्थ्याच्या प्रस्तावास रीतसर मान्यता देऊन पी. जी विभागा मार्फत पुढील कार्यवाहीस्तव भाषा,वांग्मय व संस्कृती संकुलाचे तत्कालीन संचालक प्रो.दिलीप चव्हाण यांना मान्यता पत्त्राद्वारे संकुलच्या स्तरावर डॉ. चिखलीकर यांना गाईड देण्या संदर्भात शिफारस करून पुढील कार्यवाही करण्याची सूचना केली होती.

 परंतु प्रो.दिलीप चव्हाण यांनी  विद्यार्थ्याचे गाईड बदलून देण्याचे पत्र काढले नाही त्यामुळे विध्यार्थ्याने सदरील बाबीवर त्याच्या संशोधन केंद्रास लेखी कळविले त्यावर संचालक यांनी सबब प्रकरण लक्षात घेऊन मा. प्र. कुलगुरू यांच्याकडे विध्यार्थ्याच्या मागणीस मान्यता देण्यास लेखी पत्रद्वारे विनंती केली असता त्यावर विद्यापीठाचे विद्यमान प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंग बीसेन यांनी आपल्या टिपणीत संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांना यापुढे एम.फिल  गाईडशिप न देण्याचा ठराव एम.सी च्या बैठकी मध्ये निर्णय झाल्याचा दाखला देऊन महाविद्यालयात प्रा. चिखलीकर कार्यरत असल्यामुळे  त्यांना बदली गाईड देण्यासंबंधी नकार दिला.

सदरील प्रकरण वीद्यापीठाणे कसे नियमबाह्य व चुकीच्या आधारावर त्याचा प्रस्ताव नाकारला म्हणून विध्यार्थी लक्ष्मीकांत पवार यांनी प्रशासनाच्या काही बाबी निदर्शनास आणले व पुन्हा अपेक्षेने पूर्वीच्या मान्यतेचा संदर्भ देऊन पुनर आवालोकनार्थ विद्यापीठा प्रशासनास सादर करून याचा पुनर्वीचार व्हावा म्हणून दाद मागितली यात त्याच्या बाबतीत काय राजकारण होतय त्याने काही बाबी विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणले

पूर्वीच्या संचालक प्रो.दिलीप चव्हाण यांनी गाईड बदलून देण्याचे पत्र काढने हे त्यांचे कर्तव्य व जवाबदारी होती परंतु त्यांनी पत्र काढण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली व वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाचे आवमान केल्याचा आरोप संशोधक विद्यार्थी लक्ष्मीकांत पवार यांनी कुलगुरूकडे लेखी तक्रार केली तसेंच तो तक्रारीत बाजू मांडतो की गाईड बदलून देण्याची मान्यता सन दि.20 डिसेंबर 2018  मध्ये निर्णय झाला होता. आता त्या मागणीला नाकारुन पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे हे माननीय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय आवमान आहे.

 न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणतीही कार्यालयीन बाब ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू होत नाही, ही बाब  विद्यापीठ प्रशासनाच्या विध्यार्थ्याने निदर्शनास आणले परंतु विद्यापीठ विद्यार्थ्यांचे म्हणणे मान्य करण्यास  तयार नाही व गाईड बदलून देण्याची मागणी विद्यापीठाने पुन्हा फेटाळून लावली आहे व असे आदेशित केले की विध्यार्थ्याने पूर्वीच्याच गाईडकडे  संशोधन प्रकल्प सादर करावा. परंतु विद्यार्थी सदरील प्रकरण हे पूर्वलक्षी प्रभावाने लागूच होत नाही व त्याच्या मागणीला प्रशासनाने अगोदरच मान्यता दिलेली आहे.

या निर्णयावर ठाम राहून  विद्यापीठ प्रशासनाच्या असे लक्षात आणून दिले की जर विद्यापीठ प्रशासनाने संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकना सन 2019 मध्ये मार्गदर्शक म्हणून देण्यास निर्णय जर रद्द केले तर मागच्या दोन वर्षात सलगनीत महाविद्यालयातील काही प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या विविध संकुलातील विद्यार्थ्यांनी एम. फिल संशोधन प्रकल्प कोणत्या नियमानुसार सादर केला आहे?  सदरील विद्यार्थ्यांना व त्यांच्या मार्गदर्शकांना पूर्वलक्षी प्रभावाने नियम का लादला नाही? जसा त्याच्या बाबतीत निर्णय दिला असा सवाल विद्यार्थ्याने  उपस्थित केला आहे. 

विद्यापीठ प्रशासन या प्रकरणात पक्षपातीपणा व अकॅडमिक कौन्सिलच्या एम.फिल गाईड देण्याच्या निर्णयाचं व यु. जी. सी नोटिफिकेशन दि.5 जुलै 2016 चे उल्लंघन करीत आहे असा आरोप विद्यार्थ्यानी विद्यापीठ प्रशासनावर केला आहे. जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन सदरील बाबीची गांभीर्याने दखल घेणार नाही व त्यास गाईड बदलून देण्यात मान्यता देणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार केला आहे.

मागच्या दोन वर्षापासून सदरील विद्यार्थी हा विद्यापीठ प्रशासनाकडे गाईड बदलून देण्याच्या संदर्भात सातत्याने खेटे मारत आहे. त्याने विद्यापीठ प्रशासनास कळविले की जर दोन दिवसात प्रकरण निकाली काढले नाही तर दि. 16 मार्च 2022 रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात "आमरण उपोषणास" बसण्याचा निर्णय विध्यार्थ्याने घेतला आहे .विद्यार्थ्याची रास्त मागणी मान्य करावी म्हणून त्याने महामहिम राज्यपाल तथा कुलपती व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी