हिमायतनगर ते किनवटच्या रस्त्याचे काम लवकर करा अन्यथा आंदोलन छेडणार - संदीप केंद्रे -NNL


शिवणी, प्रकाश कार्लेवाड।
हिमायतनगर ते किनवट राष्ट्रीय राज्य महामार्ग रस्त्याचे काम गुत्तेदाराच्या निष्काळजी पणामुळे मागील पाच वर्षांपासून संथ गतीने चालू आहे. या वर्षीच्या पावसाळाच्या आगोदर रस्त्याचे काम पूर्ण करून प्रवास्यांसाठी तात्काळ मार्ग सुरळीत निर्माण करून द्यावा. अन्यथा किनवट माहूर तालुक्याचे आ.भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा च्या वतीने तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे संबधित गुत्तेदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  नांदेड न्युज लाईव्हच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.                                                                       

अवघ्या तीन महिन्यावर पावसाळा तोंडावर आलेला असतांनाही किनवट-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील अनेक लहान मोठ्या पुला सहित महामार्ग मजबुती करणाचे काम अत्यंत संथ गतीने चालू असल्यामुळे या भागातील नागरिकांना प्रवास करण्यासाठी पुन्हा एकदा पावसाळ्यात वारंवार निर्माण होणाऱ्या संकटाचा सामना करण्याचे  चिन्ह निर्माण झाले आहे.किनवट नांदेड या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या कामाला गेल्या पाच वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून सुरुवात करण्यात आले होते. 

परंतु गेल्या पाच वर्षांपासून या कामाची गती पाहता येत्या पाच वर्षात हा रस्ता होईल का? नाही याबाबत सध्यातरी सांगणे अवघड दिसत आहे. या सोबतच किनवट बोधडी धानोरा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला अनेक ठिकाणी सुरुवातही झाली नाही वनविभागाच्या अडथळ्याच्या नावाखाली या भागातील नागरिकांना अक्षरशः मृत्यू समोर दिसणाऱ्या रस्त्यावरून नाइलाजास्तव प्रवास करावा लागत आहे प्रचंड खड्डेमय रस्ता खाच-खळगे,वाहनाने उडणारा प्रचंड धुराळा, अर्धवट खोदून ठेवलेले रस्ते,पुलासाठी बनवलेले वळण रस्ते इत्यादी अडथळ्यातून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.जर वनविभागाच्या परवानगी मुळे जिथे जिथे काम थांबलेले आहे.

तिथे वनविभागाची  परवानगी मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपाची त्या रस्त्यावर डांबरीकरण करून प्रवश्यांना दिलासा द्यावा अन्यथा या रस्त्यावर रस्त्याच्या कारणाने जर एखांदे अपघात झाले तर त्या नुकसणीसाठी संबधित गुत्तेदारावर  कायदेशीर गुन्हा नोंद करण्यासाठी भाग पाडू, तर नागरिकांच्या या विविध  त्रासाची संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे.बोधडी पासून जवळच असलेल्या वाळकी नाल्यावरील पूल गेल्या एक-दिड  महिन्यापूर्वी जमीनदोस्त केला पण अद्यापही कामाला सुरुवात झाले नसल्यामुळे हा पूल पावसाळ्यात डोके दुःखी करणार असे वाटते.व अवघ्या काही महिन्यांच्या अंतरावर पावसाळा येऊन ठेपलेला असल्यामुळे या भागातील विद्यार्थी शेतकरी प्रवासी इत्यादींना प्रचंड त्रासदायक  ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे येथून काही अंतरावरच जिल्हा परिषद हायस्कूल शासकीय मुलींची आश्रम शाळा याच मार्गावर हाकेच्या अंतरावर आहे.

पावसाळ्यात या नाल्यावर दर वर्षी किनवट नांदेड या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची परंपरा याही वर्षी चालू राहते की काय ? याची प्रचंड धाकधूक तालुक्यातील नागरिकांना लागलेले आहे.या मार्गावरील अनेक छोट्या-मोठ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम अर्धवट राहिल्यामुळे त्या ठिकाणी या भागातील नागरिकांना छोट्या-मोठ्या पुरामुळे वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनेला सामोरे जावे लागत असल्यामुळे यावर्षीही वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होऊन डोकेदुखी ठरण्याची शक्यता निर्माण झाली असताना ही राष्ट्रीय महामार्ग प्रशासन या रस्त्या संबंधी भ्र शब्द काढण्यास तयार नसल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे

करीता येत्या काळात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने कामाला गती देऊन लवकरात लवकर सरस्त्याचे काम पूर्ण होन्यास विलंब होत असेल तर किनवट माहूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील भाजपा च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्तांना सोबत घेऊन संबधित गुत्तेदाराच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे मत भाजपा किनवट तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे यांनी.नांदेड न्युज लाईव्ह शी बोलताना म्हणाले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी