नविन नांदेड| समृद्धी महिला स्वयंसहायता गृह उद्योग विष्णुपुरी नांदेड यांनी लावलेल्या स्टाल वर जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटणकर यांच्या सह अनेकांनी भेटी देऊन तयार केलेल्या घरगुती पदार्थ ची खरेदी केली.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध बचतगटाच्या वतीने स्टाल लावण्यात आले होते या वेळी समृद्धी महिला स्वयंसहायता गृह ऊधोग विष्णुपुरी यांनी घरगुती पद्धतीने तयार केलेले अस्सल गावरान पदार्थ शेवया, खारोड्या, कुरवड्या ,गावरानी तांदळाचे पापड, उडदाचे पापड, लोणचे,यासह अनेक पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते.
या स्टॉलला जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर , जिल्हा परिषद सदस्य प्रणीता ताई देवरे, यांच्या सह अनेकांनी भेटी देऊन स्टॉलवर खरेदी केली आहे. या बचत गटांच्या सुशिलाबाई भगवानराव हिंगोले व अश्विनी तुकाराम हंबर्डे या पदाधिकारी आहेत.