राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आदर्श नागरिक बनावे - कुलगुरू डॉ. उद्धव भोसले - NNL


नविन नांदेड|
आपण जीवनात यशस्वी आहोत का? असा प्रश्न स्वतःला विचारून यशस्वी होण्यासाठी काय करावे लागेल यासाठी नियोजन करून कठीण परिश्रमातून यशाचा राजमार्ग शोधावा.परिश्रमातुन यशस्वीता आणि आदर्श नागरिकत्वाचा विकास होतो असा संदेश कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 'पर्यावरण ,नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन व स्वच्छ भारतासाठी आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीराच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ.उद्धव भोसले यांनी रासेयो स्वयंसेवकांना दिला. 

श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय सिडको,नंवसंतराव नाईक कला,वणिज्य, विज्ञान व पदव्युत्तर महाविद्यालय वसरणी, नांदेड आणि सामाजिक शास्त्रे संकुल स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेड येथील रासेयो विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 मार्च ते 28 मार्च 2022 दरम्यान रासेयोच्या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी प्र-कुलगुरू  डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन उद्घाटकीय भाषणात म्हणाले की, प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचा विवेक जागृत केला पाहिजे तसेच आपण 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' साजरा करत आहोत हे स्वातंत्र्य आपल्याला सहज प्राप्त झालेले नाही तर ते कठीण परिश्रमातून व सामर्थ्याने मिळवलेले आहे.या स्वातंत्र्याने आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत का? आपल्या देशात आजही अनेक  समस्या उभ्या आहेत. समाजात आजही जातीयता, धार्मिक तेढ आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी माणूस जोडण्याचे काम करावे व सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असेही ते म्हणाले.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रासेयो चे संचालक डॉ.शिवराज बोकडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी  स्वा.रा.ती. म विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापण मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, स्वा.रा. ती.म. विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ.घनश्याम येळणे,वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार आणि जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. निरंजन कोर सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय सिडको नांदेड येथील रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. दिलीप काठोडे तर वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या रासेयोचे कार्यक्रमाधिकारी तथा रासेयो विभागीय समन्वयक डॉ.साहेबराव शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.विजयकुमार मोरे रासेयो कार्यक्रमाधिकारी वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नांदेड, डॉ.बाबुराव जाधव रासेयो कार्यक्रम अधिकारी सामाजिक शास्त्रे संकुल, नांदेड तसेच डॉ.प्रतिभा लोखंडे, डॉ. शिवाजी शिंदे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थीनी यांची कोविड-19 चे नियम पाळुन उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी