नविन नांदेड| मातोश्री अंजनाबाई मुंदाफळे समाजकार्य महाविद्यालय नरखेड, नागपूर यांची नुकतीच अभ्यास दौऱ्यानिमित्त जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको नवीन नांदेड येथे भेट देऊन पाहणी करून विविध विभागांची माहिती घेतली या वेळी महाविद्यालय वतीने स्वागत करण्यात आले.
श्री.सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव यांच्या प्रेरणेने आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू.आर.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रसंगी महाविद्यालयातील इंटरनल क्वालिटी आशुरन्स सेल, क्रीडा विभाग, विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट रोजगार व मार्गदर्शन केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, स्वयम् विभाग, महाविद्यालयाचे संशोधन केंद्र, ग्रंथालय विभाग, ग्रामीण विकास शिबिर, क्षेत्र कार्य, विविध विषयावरील संशोधने, परीक्षा विभाग, आदी विविध महाविद्या - लयातील विकास कामाची पाहणी करण्यात आली याप्रसंगी सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
मातोश्री अंजनाबाई मुदाफळे समाजकार्य महाविद्यालय नरखेड येथील सहलीचे समन्वयक प्रा.डॉ.मनोज पवार सर प्राध्यापिका प्रा डॉ.मंगला कडवे मॅडम प्रा.बालाजी आडे व त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग होता याप्रसंगी महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्या डॉ. निरंजन कौर सरदार या उपस्थित होत्या तर व्यासपीठावरील नॅकच्या कॉर्डिनेटर प्रा .डॉ मनीषा मांजरमकर, संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा डॉ नरहरी पाटील, परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा डॉ असिफोदिन शेख,आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.रावसाहेब दोरवे यांनी केले. याप्रसंगी प्रत्येक विभागाच्या प्रमुखांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या विकास कार्याचा आढावा याप्रसंगी सहलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या समोर मांडण्यात आला, अत्यंत उत्साहाने अभ्यास सहलीचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्रा. डॉ.अशोक वलेकर, प्रा.विद्याधर रेड्डी,प्रा.डॉ.प्रतिभा लोखंडे,प्रा. डॉ. सत्वशीला वरगंटे, प्रा.गोपाल बडगिरे, प्रा. डॉ.अंबादास कर्डिले, प्रा.सुनील गोईनवाड,प्रा. डॉ.मेघराज कपूर, प्रा. सुनील राठोड, प्रा.डॉ.शिवाजी शिंदे,प्रा. डॉ. दिलीप काठोडे महाविद्यालयाचे लेखापाल बळीराम गुंडे, संतोष मोरे, राजेश पाळेकर, नरेंद्र राठोड, सुनील कंधारकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.