नायगाव| कल्याण गल्ली नायगाव येथील एका युवा शेतकऱ्याने बेडरूममधील सिलिंग फायनल शरच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना दि.१७ रोजी होळीच्या दिवशी घडली आहे. सुमित दिगांबरराव कल्याण मयत युवा शेतकऱ्याचे नाव आहे.
दिनांक १७ मार्च रोजीचे १४०० ते १४३० वाजेच्या दरम्यान, मयत सुमित दिगांबरराव कल्याण, वय २७ वर्षे, व्यवसाय शेती रा. कल्याण गल्ली ता. नायगाव जि. नांदेड, यांनी आपल्या राहते घरी बेडरुम मधील सिलींग फॅनला शर्टचे सहाय्याने गळफास घेवुन मरण पावला. अशी माहिती सूर्यकांत रोहिदास कल्याण, वय ४५ वर्षे, व्यवसाय शेती रा. विट्ठलनगर नायगाव ता. नायगाव जि. नांदेड यांनी दिल्यावरुन नायगाव पोलीस ठाणे डायरीत आकस्मिक मृत्यू कलम १७४ सीआरपीसी कायदा प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोउपनि.श्री बाचावार, मो.नं. ९६३७३२०३५५ हे करीत आहेत.