महावितरण कंपनीचा भोगळ कारभार्‍यामुळे तीन ते चार दिवस देगाव अंधारात पाण्यासाठी भटकंती -NNL

लाईट नसल्यामुळे गावकऱ्यांनी थेट कार्यालयासमोर आत्मदहनाचा दिला इशारा


नायगाव, दिगंबर मुदखेडे|
नायगाव तालुक्यातील देगाव गेली ३ ते ४ दिवसापासून अंधारात आहे. नवीन आलेले इंजिनीयर दुधमल व देगावला दोन लाईन मेन कारताळे व भालेराव असून, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच, गावकऱ्यांनी तक्रार करून देखील अडचण सुटत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. लाईट नसल्यामुळे गावकऱ्यांनी थेट कार्यालयासमोर आत्मदहनाचा दिला इशारा देण्यात आला. आमच्या मृत्यूला कारणीभूत महावितरण कंपनीचे शाखा अभियंता जबाबदार असतील असे सांगण्यात येत आहे.

गावातील सरपंच नागरिकांनी वीजपुरवठ्या बाबतची अडचणीची महावितरण अधिकाऱ्याकडे मांडल्या सतत दोन ते तीन दिवस त्यांच्याकडे सारखे जाऊन देगाव लाईटची अडचण सोडण्याचे सोडून आज करू उदा करू उडवाउडवीची उत्तरे देले जात आहेत. आजपर्यंत अनेकदा देगाव ग्रामपंचायत लगत असलेल्या डि पी केबल जळून खाक झाले. मात्र कुठल्याच प्रकारची तत्पर सेवा संबंधित महावितरण विभागाकडून सुविधा मिळालेला नाही. अधिकाऱ्यांना फोन लावले असता उचलत नाहीत. महावितरण कंपनीचा फार मोठा भोंगळ कारभार चालला आहे.

वेळोवेळी तक्रार देऊन किंवा फोन करून पण कोणत्याही प्रकारचे गावकर्‍यांचे प्रश्न सुटलेले नसून, देगाव सलग ते पंधरा दिवस झाले अंधारात आहे. आता  महावितरणचे कर्मचारी मात्र वसुली करण्यात मग्न असून, त्यामुळे देगाव येथील लाईटचा प्रश्न प्रलंबीत आहे. लाईटचा प्रश्न कधी सुटणार का..? नाही असा प्रश्न जनतेस पडला आहे. नवीन आलेले शाखा अभियंता यानी तर राजकीय पुढाऱ्या सारखे फक्त आश्वासने देण्याचा कारभार सुरु केला आहे. नागरिकांच्या पाठपुरावाला कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने गावातील व्यक्ती लाईट अभावी पाण्याच्या त्रासामुळे नागराईक वैतागले आहेत.

दिवसभर शेतकरी शेतात कष्ट करून रात्री घरी आल्यानंतर त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील लोक मात्र महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यावर रागाच्या फूलांचा वर्षाव करत आहेत. वेळोवेळी अधिकाऱ्याला किंवा लाईनमेनला कल्पना देऊन पण, अजून लाईटचा प्रश्न सुटले नसल्यामुळे गावातील लोकांनी एकत्रित येऊन थेट महावितरण कार्यालय मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. लाईट नसल्यामुळे गावकऱ्यांनी थेट कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा देण्यात आला. आमच्या मृत्यूला कारणीभूत महावितरण कंपनीचे शाखा अभियंता जबाबदार असतील असे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी